Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

ठरलं तर.! रणवीर सिंगची मुख्य भुमिका असलेला चित्रपट ’83’ ‘या’ दिवशी होणार रिलीज, एकाचवेळी ५ भाषांत होणार प्रसिद्ध

बॉलिवूडमधील अनेक चाहत्यांना ‘रणवीर सिंग’ आणि ‘दीपिका पादुकोन’ची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी खूप आवडते. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि प्रेक्षकांकडून त्यांच्या या जोडीला आणि रोमान्सला खूपच प्रेम मिळाले आहे. हे दोघे पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांचा एक चित्रपटात लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा ’83’ हा चित्रपट लवकरच चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची अनेक चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. रणवीरने ’83’ या चित्रपटातचे एक पोस्टर शेअर करून चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 3 जुनला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात रणवीर सिंग भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका निभावत असून कपिल यांच्या पत्नीची भूमिका दिपीका करणार आहे. ’83’ हा चित्रपट आधी 2020 मध्ये रिलीज होणार होता ,परंतु लॉकडाऊनमुळे या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.  ‘कबीर खान’ हे 83 या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून त्यांच्यासह सर्वांनाच या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

हे देखील वाचा