प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर त्याचा शो ‘कॉफी विथ करण‘ याचे सातवे पर्व घेऊन आला आहे. यामध्ये त्याचे पहिले पाहुणे म्हणून ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाचे मुख्य कलाकार रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे उपस्थित होते. यादरम्यान करणसमोर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यादरम्यान आलिया तर पुरती लाजून लाल झाली होती. मात्र, रणवीरने बिनधास्त सांगितले की, त्याने आणि दीपिका पदुकोण हिने त्यांची सुहागरात (मधुचंद्राची रात्र) कशाप्रकारे साजरी केली होती. अभिनेत्याने हेदेखील सांगितले की, त्यांना इंटीमेट झाल्यानंतर कोणते गाणे ऐकायला आवडते.

रणवीर सिंगने कशाप्रकारे साजरी केली सुहागरात
‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये रणवीरने त्याच्या वैयक्तित आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. ‘बिंगो गेम’दरम्यान रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचे अनेक गुपीत समोर आले. रणवीरने मान्य केले की, तो आणि दीपिका सुहागरातवेळीही इंटीमेट झाले होते. सोबतच त्याने हेही सांगितले की, त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्येही सर्वकाही केले होते. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या सेक्सच्या वेगवेगळ्या प्लेलिस्टही होत्या. जेव्हा करणने विचारले की, तो लग्नाच्या सर्व समारंभानंतरही थकले नव्हते का? यावर तो म्हणाला की, “नाही, मी खूप व्यस्त होतो.”

सुहागरातवेळी कसे होते रणवीरची स्थिती
सुहागरातच्या प्रश्नावर आलिया भट्ट (Alia Bhatt) हिची रिऍक्शन पूर्णपणे वेगळी होती. तिने स्पष्ट सांगितले की, सुहागरातवेळी काहीच होत नाही. कारण, जोडपे थकलेले असते. जे कोणी म्हणतं की, आम्ही सुहागरात केली होती, ते खोटे बोलत आहे. ती म्हणाली की, “सुहागरातसारखं काहीच नसतंय. तुम्ही थकलेले असता.” मात्र, हे सर्व रणवीरवर लागू होत नाही. तो खूपच एनर्जेटिक आहे.

‘कॉफी विथ करण ७’चा लेटेस्ट एपिसोड
या एपिसोडमध्ये रणवीर सिंग याने ऋतिक रोशन, धर्मेंद्र, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि आमिर खान यांसारख्या सुपरस्टारची एकदम हुबेहूब नक्कल करून सर्वांना हैराणही केले. रणवीरने रॅपिड राऊंडनंतर गिफ्ट हँपरही जिंकले.

रणवीर सिंग त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘…लंगोट म्हणून बांधलाय’, विशाखाच्या त्या प्रश्नावर पॅडीचं भन्नाट उत्तर, व्हिडिओ पाहून खदखदून हसाल

घटस्फोट होऊनही ‘ही’ अभिनेत्री झाली होती आई, सलमासोबत काम करण्यासाठी लपवली होती एवढी मोठी गोष्ट

साऱ्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् सूनबाईंच्या शुभेच्छा दुसरीकडं, आलियाने बनवला नीतूंचा वाढदिवस खास