Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड ‘आजपर्यंत माझ्यासोबत असे घडले नाही’, ‘८३’ रिलीझ झाल्यानंतर रणवीरने केला मोठा खुलासा

‘आजपर्यंत माझ्यासोबत असे घडले नाही’, ‘८३’ रिलीझ झाल्यानंतर रणवीरने केला मोठा खुलासा

अभिनेता रणवीर सिंगचा (Ranveer Singh) अलिकडेच ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अगदी ज्यांना क्रिकेटची क्रेझ आहे आणि ज्यांना क्रिकेटची कधीच क्रेझ नव्हती, ते दोघेही डोळ्यात अश्रू घेऊन चित्रपटगृहात बसले होते. अभिनेता रणवीरला त्याच्या चाहत्यांना असेच काहीतरी द्यायचे होते. ‘८३’ प्रदर्शित झाल्यानंतर, ‘८३’ च्या अभिनेत्याने माध्यमांशी खास संवादादरम्यान काही न ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला हसू येईल.

‘८३’ मध्ये घडले तसेच दाखवले
रणवीरने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर माध्यमांशी केलेल्या संभाषणात सांगितले की, चित्रपट काय होता आणि काय रिव्ह्यू मिळाले आहेत, ते ‘८३’ मध्ये घडले होते तेच दाखवले आहे. रणवीर म्हणतो की, “ज्यांना क्रिकेट आवडते आणि ज्यांना क्रिकेट आवडत नाही, या दोघांनीही हा चित्रपट पाहिला. विश्वासच बसत नाही, यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आले. काही प्रेक्षक शिट्ट्या वाजवत होते, तर काही टाळ्या वाजवत होते. सगळा सिनेमा हॉलच जणू स्टेडियम झालाय. प्रेक्षकांच्या अप्रतिम प्रतिसादाने मन प्रसन्न झाले.

मुलाप्रमाणे कपिल देव यांनी ठेवले होते घरात
रणवीर म्हणतो की, “जेव्हा आम्ही या व्यक्तिरेखेची सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे असा कोणताही व्हिडिओ नव्हता जेणेकरून मला ते पाहून काही कल्पना येईल, म्हणून मी २ आठवडे कपिल देव यांच्या घरी राहिलो. त्या काळात मी त्यांच्याकडून सर्व काही शिकलो, उठायला बसायला शिकता येते, पण त्यांच्या आत काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, त्यांनी काय आणि कसा सामना जिंकला हे सर्व काही शिकणे सोपे नव्हते, पण केले.”

सराव कसा केला?
रणवीर सांगतो की, तो व्यायामानंतर ४ तास क्रिकेटचा सराव करायचा, शारीरिक स्थितीत २ तास आणि नंतर संध्याकाळी शूटची तयारी करायची. त्याने पुढे सांगितले की, “क्रिकेटचा सराव जवळपास ८ महिने चालला होता, त्यानंतर सुनील गावस्कर साहेब आणि इतरांनीही माझे कौतुक केले.” सुनील गावस्कर म्हणाले, “आम्ही कपिलला वयाच्या १९ व्या वर्षापासून ओळखतो आणि तू त्या वेळी कपिलसारखे सर्व काही केले आहेस.” रणवीर म्हणतो की, “चित्रपटात जे काही वास्तव आहे, मी कबीरजींना श्रेय देईन की, त्यांनी इतके छान तपशील दिले आहेत.”

रणवीरचा २४ डिसेंबर रोजी ‘८३’ हा चित्रपट भारतात जवळपास ३७४१ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर परदेशातील एकूण १५१२ स्क्रीनवर तो दाखवला जात आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास १२५ कोटी रुपये आहे. हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा