Tuesday, July 9, 2024

आनंद गगनात मावेना! लेकाचा चित्रपट १०० कोटीं रुपयांच्या क्लबमध्ये सामील होताच, रणवीर सिंगच्या आईने दिली फोटोपुढे पोझ

बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट पाच दिवसांपूर्वी म्हणजेच ५ नोव्हेंबर, २०२१ रोजी चित्रपटगृहात धडकला. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसातच १०० कोटींपेक्षाही अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत, तर दुसरीकडे रणवीर सिंग आणि अजय देवगण हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. अशातच रणवीरने आपल्या आईचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याची आई अंजू भवनानी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या पोस्टरपुढे उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोसह रणवीरने कॅप्शनही दिले आहे.

रणवीरने अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर आईचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत रणवीरने लिहिले की, “हॅलो आई.” रणवीरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचं पोस्टर दिसत आहे. तसेच अभिनेत्याची आई अभिनेत्याच्या फोटोसमोर उभी राहून पोझ देताना दिसत आहे. (Actor Ranveer Singh Starrer Sooryavanshi 100 Crore Club Mother Posed With Son Poster)

Photo Courtesy: Instagram/ranveersingh

विशेष म्हणजे, अनेक सोशल मीडिया युजर्सनी ‘सूर्यवंशी’मधील रणवीरच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. रणवीरच्या एका चाहत्याने ट्वीट केले आहे की, “‘सूर्यवंशी’ने मध्यंतरानंतर शानदार पुनरागमन केले, रणवीर सिंगने आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. ‘टिप टिप’मध्ये कॅट बोल्ड दिसत आहे आणि सिंघमचा शेवट चांगला झाला आहे.” दुसरा चाहता म्हणाला, “अक्षय कुमार चांगला होता! मात्र, ‘सिंघम’च्या भूमिकेत अजय आणि ‘सिंबा’च्या भूमिकेत रणवीरची तुलना काहीच नव्हती! त्यांची एन्ट्री चांगली होती.”

एका चाहत्याने रणवीरच्या कॉमिक टायमिंगचे कौतुक केले आणि म्हटले, “मी ‘सूर्यवंशी’चा खूप आनंद घेतला!! यासाठी बराच वेळ वाट पाहिली. ऍक्शन, कॉमेडी आणि थोडंसं इमोशन पूर्ण! सर्व चांगले होते. मी अजूनही रणवीरच्या कॉमिक टायमिंगने प्रभावित आहे, मला ते आवडले आणि प्रत्येक गोष्टीवर हसलो. कॅटची भूमिका प्रभावी होती आणि मला ती आवडली.”

‘सूर्यवंशी’च्या यशाचा आनंद घेत असलेला रणवीर कलर्स टीव्ही शो ‘द बिग पिक्चर’ देखील होस्ट करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये रोहित शेट्टीचा ‘सर्कस’, कबीर खानचा ‘८३’, करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘जयेशभाई जोरदार’ यांचा समावेश आहे.

रणवीरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटापासून केली होती.

हे देखील वाचा