Saturday, April 19, 2025
Home अन्य देवोलीना भट्टाचार्जीसोबतच्या भांडणानंतर शमिता शेट्टी बेशुद्ध, राकेश बापटने दिली ‘खंबीर’ साथ

देवोलीना भट्टाचार्जीसोबतच्या भांडणानंतर शमिता शेट्टी बेशुद्ध, राकेश बापटने दिली ‘खंबीर’ साथ

‘बिग बॉस’च्या घरात टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी  (Shamita Shetty) यांच्यातील लढाईने वेगळेच रूप धारण केले आहे. देवोलीना नुकतीच या शोमध्ये वाईल्ड कार्डच्या रुपात दाखल झाली असून, शमिता सुरुवातीपासूनच तिच्या निशाण्यावर आहे. मात्र, अलीकडे दोघींमधील भांडण वेगळ्याच पातळीवर जाऊन पोहोचले आणि त्याचा थेट परिणाम शमिताच्या तब्येतीवर झाला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. कलर्सने या दरम्यानचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. तो अद्याप टेलिकास्ट केला नाही. आता या दोघींच्या भांडणावर शमिताचा बॉयफ्रेंड राकेश बापट (Raqesh Bapat) याने प्रतिक्रिया दिली आहे.

राकेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तो शमिताला सावरताना दिसत आहे. हा फोटो ‘बिग बॉस ओटीटी’ दरम्यान घेतलेला आहे, जिथे शमिता आणि राकेश यांनी भाग घेत जोडी म्हणून खेळले होते. या फोटोत शमिता भावुक दिसत आहे आणि राकेश तिच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे, जणू तिची हिंमत वाढवत आहे. देवोलीना आणि शमिता यांच्यात सुरू असलेल्या भांडणाच्या दरम्यान राकेशचा हा फोटो शेअर करताना स्पष्टपणे दिसत आहे की, तो त्याच्या गर्लफ्रेंडला खंबीर राहण्याचा सल्ला देत आहे.

फोटोसोबत राकेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कधीकधी जेव्हा गोष्टी तुटत असतात, तेव्हा त्या खरोखर योग्य ठिकाणी भेटतात, खंबीर राहा!”

देवोलीनाने का सोडला शो?
तसे, या दोघींमधील भांडणाचा एपिसोड अद्याप टीव्हीवर प्रसारित झालेला नाही, पण असे म्हटले जात आहे की, शमिता बेशुद्ध होऊन घराबाहेर गेली होती, मात्र निर्मात्यांनी तिला पुन्हा शोमध्ये आणले आहे. भांडणाच्या वेळी देवोलीना शमिताला म्हणाली की, “मी तुझी शेट्टीगिरी बाहेर काढते.” हे ऐकून शमिताला राहवले नाही.

यानंतर दोघींमध्ये जोरदार भांडण झाले आणि शमिता करणच्या हातावर बेशुद्ध झाली. प्रोमोमध्ये शमिता बेशुद्ध झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसता राडा! जगभरात गाजतोय मोहनलाल यांचा ‘मरक्कर’, पहिल्याच दिवशी यूएईत कमावले कोट्यवधी रुपये

-कंगना माफी मांगो, अभी के अभी…! अखेर माफी मागितल्यावरच झाली अभिनेत्रीची सुटका; पाहा कुठे घडला ‘हा’ प्रकार

-याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी

हे देखील वाचा