Tuesday, July 9, 2024

राकेशने शेअर केली शमितासोबतची रोमँटिक रील; व्हिडिओ पाहून बहीण शिल्पा शेट्टी म्हणाली…

‘बिग बॉस’चा १५ वा सीझन सुरू झाला आहे. हा वादग्रस्त शो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांची उत्सुकताही खूप वाढू लागली आहे. सोशल मीडियावरही या शोची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर पुन्हा एकदा शमिता शेट्टीने बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री केली आहे. जेव्हा शमिता शेट्टी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये होती, तेव्हा तिचे कनेक्शन राकेश बापटसोबत झाले होते. घराबाहेर आल्यानंतरही शमिता आणि राकेश अनेकदा लंच आणि डिनर डेट्सवर दिसतात. अगदी राकेश,  शमिताची बहीण म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही भेटला आहे. अशा परिस्थितीत, आता शमिता ‘बिग बॉस १५’च्या घरात गेली आहे, तर राकेश तिला खूप मिस करत आहे.

अलीकडेच राकेश बापटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये राकेश शमिताचा हात धरून चालत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुला स्क्रीनवर पाहून विचित्र वाटते, कारण तू माझ्या शेजारी नसणार. पण मला माहित आहे की, तू उत्तम परफॉर्मन्स देशील आणि चमकशील! या प्रवासात तुला पाठिंबा देण्यासाठी मी मनाने तुझ्या सोबत राहील! तू प्रेरणादायी आणि मजबूत आहेस.”

राकेशची ही पोस्ट पाहून शमिताची बहीण शिल्पाही खूप भावूक झाली आणि स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकली नाही. शिल्पाने यावर, “Awwww” अशी कमेंट केली आहे.

या शोची थीम जंगल आहे. ज्यात स्पर्धकांचा मार्ग कठीण करण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांना कठोर परीक्षेतून जावे लागेल.

त्याचबरोबर ‘बिग बॉस १५’मध्ये शमिता शेट्टीचा गेम काय असेल, हे पाहणे मनोरंजक ठरेल. शमिता शेट्टी याआधीही ‘बिग बॉस ३’मध्ये दिसली होती पण शिल्पा शेट्टीच्या लग्नामुळे ती शो पूर्ण न करताच बाहेर पडली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा