Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या डोळ्यातील जादू…’, म्हणत रश्मिकाने किलर अंदाजातील फोटो केला शेअर; पाहून हरवले चाहत्यांचे भान

‘माझ्या डोळ्यातील जादू…’, म्हणत रश्मिकाने किलर अंदाजातील फोटो केला शेअर; पाहून हरवले चाहत्यांचे भान

रश्मिका मंदाना भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे रश्मिकाने अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. आजकाल रश्मिका टॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत चर्चेत आहे. रश्मिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे आणि अनेकदा ती तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते. पुन्हा एकदा रश्मिकाची एक अतिशय सुंदर स्टाईल इंस्टाग्रामवर पाहायला मिळाली. रश्मिका मंदानाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोत ती नेहमीप्रमाणे खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तिच्या या फोटोमध्ये रश्मिकाने पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप परिधान केला आहे. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. रश्मिकाचे मोकळे केस आणि तिचा किलर अंदाज चाहत्यांचे भान हरवण्यासाठी पुरेसा आहे.

रश्मिकाने तिचा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये तिच्या डोळ्यांचा उल्लेख केला आहे. रश्मिकाने या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या डोळ्यातील जादू आणि माझ्या हृदयातील चमक पाहा.”

नक्कीच या फोटोत रश्मिकाच्या डोळ्यात एक प्रकारची जादू दिसत आहे, ज्याने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत २६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच ३१ हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. चाहते तिच्या या फोटोचे खूप कौतुक करत आहे.

रश्मिकाने कन्नड चित्रपट ‘किरिक पार्टी’द्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. नंतर तिने विजय देवरकोंडासोबत ‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘गीता गोविंदम’ नावाचे दोन चित्रपट केले आणि नंतर तेलुगू चित्रपटांमध्येही तिने काम करण्याचा केला. आता रश्मिकाने बॉलिवूडमध्येही आपला जलवा दाखवण्यास सुरुवात केली आहे. रश्मिका लवकरच २ हिंदी चित्रपट ‘अलविदा’ आणि ‘मिशन मजनू’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या ‘बेस्ट कंपनी’सोबत मस्ती करताना दिसली समंथा, व्हिडिओ शेअर करून लिहिली ‘ही’ खास गोष्ट

-रणबीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने केला रोमँटिक फोटो शेअर; मनातील भावनाही केल्या व्यक्त

-रणबीरला ‘यशराज फिल्म्स’कडून वाढदिवसाची अनोखी भेट, ‘शमशेरा’मधील लूक प्रदर्शित

हे देखील वाचा