Monday, July 1, 2024

‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

दक्षिण सिनेमाची ब्यूटी क्वीन अभिनेत्री डिंपल हयाती शनिवारी (२१ ऑगस्ट) आपला २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २१ ऑगस्ट १९९८ मध्ये आंध्र प्रदेशातील पेंटापादू येथे झाला. या खास प्रसंगी साऊथचा सुपरस्टार अभिनेता रवी तेजाने तिला एक खास भेट दिली आहे. खरं तर त्याने त्यांच्या आगामी ‘खिलाडी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्रीचा चित्रपटातील लूक देखील पाहायला मिळत आहे.

अतिशय रोमँटिक आहे ‘खिलाडी’चे पोस्टर 
अभिनेता रवी तेजानी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपट ‘खिलाडी’चे पोस्टर रिलीझ केले आहे. यामध्ये तो डिंपल हयातीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीच्या लाजरेपणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर डिंपल लाजतानाची तिची अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

हे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्कटता वाढली आहेत. त्याचबरोबर हे पोस्टर पाहून अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोस्टरमध्ये दोन्ही कलाकारांच्या लूकचे बरेच कौतुक केले जात आहे, तर काहीजण स्वतःला रवी तेजाचे मोठे चाहते म्हणत आहेत. साऊथमध्ये रवी तेजाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो सर्व चाहत्यांचा आवडता स्टार आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर त्याचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

या अगोदर त्याने चित्रपटाचे काही पोस्टर शेअर केले होते. यामध्ये त्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळाला, जो चाहत्यांना खूप आवडला.

अभिनेत्री डिंपल हयातीबद्दल बोललो, तर आज तिने साऊथ चित्रपटसृष्टीतील आपली खास ओळख बनवली आहे. चाहते तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्याचेही वेडे आहेत. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड फोटोने चाहत्यांना वेड लावते. तिने २०१७ च्या तेलगू चित्रपट ‘गल्फ’ मधून अभिनयाची सुरुवात केली. यानंतर, तिने तेलगू चित्रपट ‘गड्डालाकोंडा गणेश’मध्ये एक आयटम साँग करून खूप प्रशंसा मिळवली. यामध्ये ती वरुण तेज आणि अथर्वसोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’

-‘नसीब अपना अपना’मध्ये राधिकांनी साकारली ऋषींच्या पत्नीची भूमिका; कोट्यवधींच्या कर्जामुळे सोसावी लागली…

-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…

हे देखील वाचा