Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा आरआरआर सिनेमातील ‘या’ दिग्गज कलाकाराचे निधन, राजामौली यांनी पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

आरआरआर सिनेमातील ‘या’ दिग्गज कलाकाराचे निधन, राजामौली यांनी पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर अशा ‘आरआरआर’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारे ऑरिश अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी इटलीत अखेरचा श्वास घेतला आहे. रे स्टीवेन्सन यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे, मात्र त्यांच्या निधनाचे कारण अजून समोर आलेले नाही. रे स्टीवेन्सन यांनी ‘आरआरआर’ सिनेमात गव्हर्नर स्कॉट बक्सटन ही नकारात्मक भूमिका साकारली होती. स्टीवेन्सन यांच्या करियरमधील ‘आरआरआर’ हा एकमेव भारतीय सिनेमा होता.

दरम्यान आरआरआर सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या राजामौली यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करत स्टीवेन्सन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजामौली यांनी ट्विटरवर आरआरआर सिनेमाच्या सेटवरील स्टीवेन्सन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “धक्कादायक…या बातमीवर अजून विश्वास बसत नाही. रे नेहमीच सेटवर खूप उर्जेसह यायचे. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे खरी मजा होती. माझ्या प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”

तत्पूर्वी रे स्टीव्हनसन यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांचा जन्म २५ मे १९६४ रोजी लिस्बर्न, उत्तर आयर्लंड येथे झाला. वयाच्या ८ व्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि तिथे त्यांनी ब्रिस्टल ओल्ड विक थिएटर शाळेत प्रवेश घेतला. पदवी संपादन केल्यानंतर पुढे त्यांनी १९९० सालापासून युरोपियन टीव्ही मालिका आणि टेलिफिल्म्समध्ये काम करत त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. स्क्रीन क्रेडिट हेलेना बोनहम कार्टर आणि केनेथ ब्रानाघ यांच्यासोबत पॉल ग्रीनग्रासच्या १९९८ च्या ‘द थिअरी ऑफ फ्लाइट’ या नाटकात त्यांनी काम केले आणि त्यांना मोठे यश मिळाले. ते एंटोनी फुक्वाच्या ‘किंग आर्थर’, लेक्सी अलेक्झांडरच्या ‘पनिशर: वॉर झोन’, ह्यूजेस ब्रदर्सच्या ‘द बुक ऑफ एली’ आणि अॅडम मॅकेच्या ‘द अदर गाईज’, पुनीशर: वॉर जोन, मार्वलच्या थॉर मूवीजमध्ये वोल्स्टेग आणि किल द आयरिशमॅन मध्ये देखील दिसले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह

विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’

हे देखील वाचा