Saturday, July 6, 2024

बापरे! केस कापणाऱ्या व्यक्तीकडून ‘हे’ काय घडलं, रितेश देशमुखने स्वत:वरच काढला राग, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, जे सिनेमा आणि अभिनय याव्यतिरिक्त त्यांच्या विनोदबुद्धीसाठी ओळखले जातात. या अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुख याच्या नावाचाही समावेश आहे. मराठमोळा रितेश नेहमीच सोशल मीडियावर त्याचे मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. कधी तो त्याच्या मुलांसोबत, तर कधी पत्नी जिनिलिया देशमुख हिच्यासोबत मस्ती करतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, तो केस कापण्यापूर्वी हेअर स्टायलिस्ट त्याच्या केसांवर पाण्याच्या बॉटलने पाणी मारत आहे. त्यावेळी रितेश कंटाळून सगळी बॉटल स्वत:च्याच डोक्यावर ओतून घेतो. यानंतर पुन्हा हेअर स्टायलिस्ट त्याच्या केसांवर बॉटलने पाणी मारतो, त्यानंतर रितेश असेच काहीसे करतो. मात्र, यावेळी समोरचा व्यक्ती खूपच घाबरतो.

रितेशचे एक्सप्रेशन्स (Riteish Deshmukh Expressions) यावेळी खूपच मजेशीर दिसतात. रितेशच्या व्हिडिओवर फक्त चाहतेच नाही, तर प्रसिद्ध कलाकारही कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, “खूपच कूल आहेत सर.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “खूपच मजेशीर.” याव्यतिरिक्त दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी हसण्याचे इमोजी कमेंट केले आहेत. याव्यतिरिक्त अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने कमेंट केली की, “मला हे नेहमीच करावं वाटतं, पण गप्प बसते.” तसेच, दिग्दर्शिका फराह खान हिने कमेंट करत लिहिले की, “हाहाहा सुपर्ब, तुझे एक्सप्रेशन्स.” यासोबतच तिने हसण्याचा इमोजीही कमेंट केला आहे.

याव्यतिरिक्त रितेशने ‘मस्ती’, ‘हाऊसफुल’ यांसारख्या धमाल सिनेमात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अरेरे! कोट्यवधी रुपयांचे सिनेमे तयार करणाऱ्या दिग्दर्शकाच्या मुलीला तीन दिवसाचं राशनही नव्हतं परवडत

बापरे! मृण्मयी देशपांडेने धाकटी बहीण गौतमीला काढलं झोडून, पण का? घ्या जाणून

‘दादा तुझा हाच वेगळेपणा भावतो…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

हे देखील वाचा