Friday, July 5, 2024

‘प्रजातंत्र’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रितेश अन् काजल राघवानीचा हॉट रोमान्स चर्चेत

भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार रितेश पांडे आणि सुपर हॉट अभिनेत्री काजल राघवानी सध्या त्यांच्या आगामी ‘प्रजातंत्र’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच शुक्रवारी (दि. 7 ऑक्टोबर)ला त्यांच्या ‘प्रजातंत्र’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच तो यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘प्रजातंत्र’चा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेश आणि काजलची जोडीही चांगलीच पसंत केली जात आहे.

‘प्रजातंत्र’ हा चित्रपट राजकारणावर आधारित आहे. राजकारणासोबतच प्रेक्षकांना या चित्रपटात दमदार ऍक्शनही पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल उज्ज्वल चावडा (सोनू) म्हणाले की, “हा चित्रपट पूर्णपणे नवीन विचार आणि कथा घेऊन बनवला गेला आहे, जो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. यामध्ये ऍक्शन आणि राजकारणाव्यतिरिक्त रितेश पांडे(Ritesh Pandey) आणि काजल राघवानी (Kajal Raghwani) यांच्यातील सुंदर प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.”

‘प्रजातंत्र’ या चित्रपटात रितेश आणि काजलसोबतच संजय पांडे आणि विनीत विशाल हे दिग्गज कलाकारही आहेत. शांती फिल्म प्रॉडक्शन, जेएमएस इन असोसिएशन विथ मॅड्स मुव्हीज आणि झ्युअल मूव्हीज या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे निर्माते सुभाष यादव, समीर आफताब, अविनाश रोहरा आहेत, तर या चित्रपटाची कथा राकेश त्रिपाठी यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एचएस पवन यांनी केले आहे. चित्रपटाचे पीआरओ रंजन सिन्हा आहेत, तर संगीत मधुकर आनंद यांचे आहे.

काजल राघवानी आहे लाेकप्रिय अभिनेत्री
काजल राघवानी अभिनयासोबतच सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ साेशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. त्याचबरोबर तिच्या प्रत्येक पोस्ट चाहत्यांच्या पसंतीस उतरते. चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फीफा वर्ल्डकपचे एँथम साँग रिलीज, नोरा फतेहीने भन्नाट डान्स करून रचला इतिहास

अभिमान असायला हवा! दीपिकाने फॅशन शोमध्ये आई-वडिलांसोबत पसरवले सौंदर्याचे जलवे, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा