Wednesday, July 3, 2024

रितेश अन् नीलमचं ‘मटक मटक के’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’ व्ह्यूज

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रितेश पांडे आपल्या अभिनयाने व संगीताने मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. साल २०१० पासून त्याने आपल्या गायकीच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्याचा कल अभिनयाकडे वळू लागला. त्याच्या गाण्यांना व अभिनयाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तो नेहमीच आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या अभिनयात वेगळेपण साकारण्याचा प्रयत्न करतो. नुकतंच त्याचं एक नवीन गाणं यूट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.

रितेश पांडेचे ‘मटक मटक के’ हे गाणे वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. रितेश पांडे व शिल्पी राज यांनी हे गाणे गायले आहे, तर संगीत आशिष वर्मा यांनी दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शक रवी पंडित आहेत. (Actor Ritesh Pandey And Neelam Giri New Bhojpuri Song Matak Ke Video Release)

या संपूर्ण गाण्यामध्ये रितेशला नीलम गिरीने अभिनयात साथ दिली आहे. आपल्या दमदार अभिनयाने हे गाणे आता चांगलच गाजत आहे. या गाण्याला एकाच दिवसाच्या आत १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या संपूर्ण गाण्यामध्ये कॉलेजमधील प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची अचानक भेट होते. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तसेच गण्यामध्ये अभिनेत्रीचे कपडे हे फार आकर्षक आहेत. तिचे चाहते आता तिच्या सारखेच कपडे परिधान करणे पसंत करतात.

काही दिवसांपूर्वी रितेश पांडेचे ‘राखी के दिने चल अईहा’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्यालादेखील चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. रिद्धी म्युझिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित केले आहे. या गाण्यामध्ये बहीण- भावांचे प्रेम दाखवले आहे. आपला भाऊ सीमेवर लढत असताना त्याच्या बहिणीचा फोन येतो. तो फोन दुसरी व्यक्ती घेते आणि तुझा भाऊ सीमेवर लढत आहे असे सांगते, तेव्हा बहीण अगदी भावुक होऊन विचारते, “दादा या वर्षी पण राखी बांधायला येणार नाही का?”

या सर्वांमधून सीमेवरील सैनिकांचे जीवन आणि त्याच्या नातेवाईकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम दाखवण्यात आले आहे. रितेशच्या सध्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘सरफरोश’ या चित्रपटात परेश लाल यादव यांच्यासह दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अपना टाइम आएगा’ म्हणत राणीने चॅटर्जीने शेअर केला व्हिडिओ; नेटकरी म्हणतायेत, ‘अजून किती बारीक व्हायचंय’

-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

हे देखील वाचा