Friday, July 5, 2024

‘हॅरी पॉटर’ चित्रपटातले अभिनेते रॉबी कोल्ट्रेन यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन

हॅरी पॉटर’ चित्रपटात रुबियस हॅग्रिडची भूमिका साकारणारे अभिनेता रॉबी कोलट्रेन यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. ‘हॅरी पॉटर’ व्यतिरिक्त, रॉबी कोलट्रेन हे ‘क्रॅकर’ या गुप्तहेर नाटकात दिसले होते. ते त्यांच्या कॉमेडीसाठीही ओळखले जात होते. कॉमेडी व्यतिरिक्त, रॉबी कोल्टरेन एक लेखक देखील होते.

रॉबी कोलट्रेन (Robbi Coltrane) यांचा मृत्यू रुग्णालयात झाला. रॉबी कोलट्रेन यांच्या मृत्यूने त्याची बहीण, मुले आणि आई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, रॉबी कोलट्रेन हे रूग्णालयात किती दिवसांपासून होते, त्यांना कशाचा आजार हाेता, याविषयी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ही दुःखद बातमी आल्यापासून हॅरी पॉटर यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. प्रत्येकजण आपल्या लाडक्या हॅग्रीडला मिस करत आहे. #RobbieColtrane ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

रॉबी कोलट्रेन यांना शेवटचे हॅरी पॉटर फ्रँचायझीच्या 20 व्या वर्धापन दिनाच्या शो रिटर्न टू हॉगवॉर्ट्समध्ये पाहिले गेले होते. 2022 मध्ये नवीन वर्षाच्या दिवशी ऍमेझाॅन प्राईम वर हा शो आला. या शोच्या एका सीनमध्ये रॉबीने सांगितले की, पुढील 40 वर्षांमध्ये तो या जगात राहणार नाही, परंतु त्याचे हॅग्रीड हे पात्र तसेच असेल. हा सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.

रॉबी कोलट्रेन हाेते विनाेदी कलाकार
रॉबी कोल्ट्रेन यांनी हॅरी पॉटर फ्रँचायझी चित्रपटांव्यतिरिक्त ‘दो जेम्स बाँड’ चित्रपटांमध्येही काम केले. ते 1995 च्या ‘गोल्डन आय’ आणि 1999 च्या ‘द वर्ल्ड इज नॉट इनफ’ मध्ये दिसले होते. क्रॅकर या प्रसिद्ध क्राईम ड्रामा शोमध्येही त्यांनी काम केले. रॉबी हे विनोदी कलाकार होते. ते 1983 मधील कॉमेडी मालिका अल्फ्रेस्को आणि स्कॉटिश ड्रामा शो टुटी फ्रुटीमध्ये देखील दिसले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
ताेबा ताेबा! नोरा फतेही समुद्र किनारी झाली जास्तच बाेल्ड; बिकिनीतील डान्स व्हिडिओ व्हायरल

उर्फीच्या पार्टीमध्ये पाेहचला एक्स बाॅयफ्रेंड,अभिनेत्रीने शेअर केली भन्नाट पाेस्ट

हे देखील वाचा