Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड खऱ्या आयुष्यात ‘इतकी’ शिकलीय ‘अनुपमा’ फेम रुपाली, मिथुन चक्रवर्तींसह पडद्यावरही केलाय तिने रोमान्स

खऱ्या आयुष्यात ‘इतकी’ शिकलीय ‘अनुपमा’ फेम रुपाली, मिथुन चक्रवर्तींसह पडद्यावरही केलाय तिने रोमान्स

स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’ गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची लोकप्रियता या दिवसात इतकी वाढली आहे की, तिने खूप कमी वेळात इतर टेलिव्हिजन मालिकांना मागे टाकले आहे. २०२० मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच टीआरपी यादीमध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये अनुपमाची भूमिका साकारणाऱ्या रूपाली गांगुली घराघरात आवडीची बनली आहे.

अल्पावधीतच या लोकप्रियतेमुळे, मालिकेत दिसणारे सर्व कलाकार प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहेत. सर्व कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अनुपमाचे पात्र अर्थात, शोमध्ये सर्वांनाच रुपाली गांगुली सर्वात जास्त आवडत आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अभिनेत्रीने सर्वांना तिचे प्रशंसक बनवले आहे.

रूपालीने चित्रपटांमध्येही केलंय काम
टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली गांगुलीला, तिच्या अभिनयामुळे आता अनुपमा म्हणून अधिक ओळखले जाते. तिचा जन्म ५ एप्रिल १९७७ रोजी कोलकाता येथे झाला होता. छोट्या पडद्याशिवाय ४४ वर्षीय अभिनेत्रीने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचे वडील अनिल गांगुली हे चित्रपट दिग्दर्शक होते.

वयाच्या १९ व्या वर्षी मिथुन चक्रवर्तीसोबत केलं काम
रूपाली गांगुलीने बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने १९९६ मधील ‘अंगारा’ चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी रुपालीचे वय फक्त १९ वर्षे होते, तर मिथुन चक्रवर्ती ४५ वर्षांचे होते.

२०१३ मध्ये झाले लग्न
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलयचं झालं, तर रुपाली गांगुलीने २०१३ मध्ये अश्विन वर्माशी लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा आहे. रुपालीच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं, तर खऱ्या आयुष्यात अभिनेत्री खूप शिकलेली आहे आणि तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स देखील केला आहे.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असते अभिनेत्री
टीव्ही मालिकांमध्ये साधे आयुष्य जगणारी अनुपमा खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहेत. वयाच्या ४४ व्या वर्षीही ती बरीच फिट आणि सुंदर दिसते. यासोबतच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. अलीकडेच, अभिनेत्रीने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारसोबत केले होते पदार्पण; मात्र सुंदरतेने वेड लावलेली शांतीप्रिया आज का राहतेय बॉलिवूडपासून दूर?

-सिद्धार्थ शुक्लाच्या कुटूंबाकडून जारी करण्यात आले निवेदन; मुंबई पोलिसांचे आभार मानत, लोकांना केली ‘ही’ विनंती

-हर्षवर्धन राणेनंतर ‘या’ प्रसिद्ध खेळाडूसोबत नात्यात आहे किम शर्मा; स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा