Monday, April 21, 2025
Home मराठी ‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट

‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट

मराठी टेलिव्हिजनविश्वातील ओळखीचा चेहरा म्हणजे अभिनेता ऋतुराज फडके. आतापर्यंत ऋतुराजने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र त्याला झी मराठीवरील मनं उडू उडू झाले या मालिकेने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत जरी त्याने नकारात्मक भूमिका निभावली असली तरी तो चांगलाच हिट झाला.

ही मालिका संपल्यानंतर त्याचे फॅन्स त्याला मिस करत होते. मात्र मधल्या काळात त्याने लग्न केले आणि आता पुन्हा तो कामावर परतला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने स्टार प्रवाह चॅनेलवर सुरु असणाऱ्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. मागील काही वर्षांपासून ही मालिका सतत टॉपवर असून लोकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत सुनील बर्वे मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतेच ऋतुराजने सुनील बर्वे यांच्याशी संबंधित एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruturaj Phadke (@ruturajphadke)

ऋतुराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचा आणि सुनील बर्वे यांचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “2003 साली “हीच तर प्रेमाची गंमत आहे” हे सुनील बर्वे ह्यांचं नाटक बघायला गेलो होतो.. तेव्हा मी इयत्ता आठवी मध्ये असेन.. तेंव्हा मी नुकतंच बालनाट्य, एकपात्री स्पर्धा, हे करणं सुरू झालं होत. म्हणून कदाचित नाटकं संपल्यावर मागे बॅकस्टेजला भेटायला गेलो तेव्हा मोकळेपणाने सगळया प्रेक्षकांशी सुनील बर्वे sir बोलतं होते.. नाटकं कसं वाटल विचारत होते, ते ज्या प्रकारे सगळया प्रेक्षकांशी संवाद साधत होते त्यामुळे माझ्या सकट सगळ्यां प्रेक्षकाची त्यांनी मन जिंकली आणि त्यादिवशी त्यांची माझ्यावर छाप पडली. त्या दिवशी मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली, सुनील बर्वे ह्यांचीच.. आणि मग जेव्हा जेव्हा कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात प्रयोग असायचा तेव्हा तेव्हा मी सुनील sir ना भेटायला जायला लागलो.. ”

पुढे ऋतुराजने लिहिले, “मी लहान असल्यामुळे ते सुद्धा माझी आपुलकीने विचारपूस करायचे.. बोलण्या बोलण्यात त्यांनाही कळलं की मी बालनाट्य, एकांकिका स्पर्धा करतो.. मी त्यांना सांगितलं मलाही ह्या क्षेत्रात करिअर करायचे.. तेव्हा त्यांचा सल्ला होता आधी शिक्षण पूर्ण कर.. आणि मग नीट विचार कर.. तोच सल्ला माझ्या आई-बाबांचाही होता.. कालांतराने नाटकाचे प्रयोग कल्याण मध्ये कमी झाले.. एक दोन भेटी नंतर आमच्या भेटीसुद्धा बंद झाल्या.. मध्ये मध्ये प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने ते मला दिसायचे पण गॅप खूप पडला होता. त्यामुळे मी भेटणं टाळत होतो. भीती ही होती की ते मला ओळखतील का? पण त्यांनी मला का ओळखावं. आमच्यात खूप फॉर्मली दोन भेटी ते तीन भेटी झाल्या होत्या. आणि मी एक लहान फॅन असल्यामुळे ते मला entertain करत होते.. पण आज तब्बल २० वर्षां नंतर मी सुनील बर्वे ह्यांच्या सोबत काम करतोय..खूप मोठं स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय.. त्यांनी मला सेटवर सुनील सरांवरून सुनील दादांवर कधी आणलं माझं मला कळलं नाही..ते जुने दिवस आणि आजचे दिवस आठवले की मन भरून येत..”

ऋतुराजच्या या पोस्टवर खुद्द सुनील बर्वे यांनी देखील कमेंट केली आहे. त्यांनी त्यांच्या कमेंटमध्ये लिहिले, “अरे किती छान लिहीलंयस!!! तुला खूप खूप शुभेच्छा!!!” यासोबतच अनेक कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंट्स केल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय

हे देखील वाचा