Saturday, June 29, 2024

भारतापासून ब्रिटन ते अमेरिकेपर्यंत होता ‘या’ अभिनेत्याचा डंका, बॉलिवूडचा एकही ऍक्टर मोडू शकला नाही त्यांचा विक्रम

‘गांधी’ चित्रपटात सरदार पटेल यांची भूमिका साकारून सईद जाफरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या दमदार अभिनयाने छाप पाडली. सईद हे भारतीय-ब्रिटिश अभिनेते होते. त्यांनी रेडिओ, स्टेज, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम केले होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेते होते, ज्यांच्यामध्ये अनेक प्रतिभा दिसून आल्या. त्यांना अनेक भाषा बोलायच्या होत्या. त्यांनी अनेक ब्रिटिश, अमेरिकन आणि भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये जितकी ओळख होती तितकी त्यांची ओळख ब्रिटन आणि अमेरिकेत होती. 80 आणि 90 च्या दशकात ब्रिटनमधील आशियाई वंशाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक त्यांची ओळख होती. आज जरी ते आपल्यामध्ये नसले, तरीही त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. सईद यांची शनिवारी (8 जानेवारी) 94वी जयंती आहे. चला तर मग त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

सईद (Saeed Jaffrey) यांचा जन्म 8 जानेवारी, 1929 रोजी झाला. सईद जबरदस्त मिमिक्री करायचे. शालेय जीवनापासूनच ते आपल्या शिक्षकांचे अनुकरण करू लागले.1995मध्ये सईद यांना नाट्यक्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल ब्रिटिश साम्राज्याचा मानद कमांडर म्हणून सन्मानित करण्यात आले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सईद हे ब्रिटिश साम्राज्याचा मानद कमांडर प्राप्त करणारे पहिले आशियाई अभिनेते होते. सईद यांचे शिक्षण मिंटो सर्कल अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झाले आणि त्यानंतर अमेरिकेच्या कॅथोलिक विद्यापीठातून दुसरी पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्ती मिळाली.

शेक्सपियरची नाटके रंगवण्यासाठी युनायटेड स्टेट्सला जाणारे सईद हे पहिले भारतीय अभिनेते होते. ब्रिटिश आणि कॅनेडियन अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेले ते पहिले आशियाई अभिनेते होते. नाटकातील त्यांच्या कामासाठी ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (ओबीई) पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. इंग्रजी बोलणाऱ्या सईद यांचे हिंदी आणि उर्दूवर चांगले प्रभुत्व होते. बीबीसीच्या जागतिक सेवेसाठी सईद यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजीमध्ये शेकडो स्क्रिप्ट्स लिहिल्या. ‘प्ले द पंप’साठी त्यांना बीबीसी रेडिओसाठी प्रिक्स इटालिया प्रदान करण्यात आला.

सईद यांचे पहिले लग्न अभिनेत्री आणि टीव्ही शेफ अँकर माधुरी जाफरीशी झाले होते. सईद यांचा 1965 मध्ये घटस्फोट झाला. सईद यांनी सांगितले होते की, त्यांनी पत्नी महरुनिमा उर्फ ​​मधुर जाफरी हिच्यावर अन्याय केला. सईद यांनी सांगितले होते की, आपल्या पत्नीने थोडेसे मॉडर्न व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण ते न मिळाल्याने त्यांनी पत्नीपासून दूर राहण्यास सुरुवात केली.

सईद ‘दिल’, ‘किशन कन्हैया’, ‘घर हो तो ऐसा’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘गांधी’, ‘मासूम’, ‘शसरन के खिलाडी’, ‘सागर’, ‘राम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसले आहेत. सईद जाफरी आपल्या लोकप्रिय पात्रांद्वारे भारतीय सिनेप्रेमींच्या हृदयात कायमचे घर करून राहिले. 15 नोव्हेंबर 2015 रोजी वयाच्या 86व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडाले होते.

हेही पाहा-

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘काय वेडी आहेस तू’ म्हणत रितेश देशमुख भांडला ‘या’ अभिनेत्रीशी, व्हिडिओ झाला व्हायरल
भारतीय नेत्यांवर आधारित चित्रपट, ज्यात पाहायला मिळेल खरे राजकारण

हे देखील वाचा