Friday, November 14, 2025
Home साऊथ सिनेमा धमाकेदार पदार्पण केलेल्या साई धरम तेजचे, एकापाठोपाठ एक असे सहा सिनेमे झाले होते फ्लॉप

धमाकेदार पदार्पण केलेल्या साई धरम तेजचे, एकापाठोपाठ एक असे सहा सिनेमे झाले होते फ्लॉप

टॉलीवूड अभिनेता साई धरम तेजच्या रस्ते अपघाताच्या बातमीने त्याचे चाहते खूप चिंतीत आहेत. शुक्रवारी रात्री दुचाकी घसरल्याने अपघात झाला त्यानंतर त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, साईच्या टीमने एक निवेदन जारी करून त्याच्या चाहत्यांना सांगितले की, साई पूर्णपणे ठीक आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. साईने हेल्मेट घातले होते त्यामुळे त्याच्या डोक्याला कोणतीही इजा झाली नाहीये.  जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

साई धरम तेजचा जन्म १५ ऑक्टोबर १९८६ रोजी हैदराबाद येथे झाला. त्याचे खरे नाव पांजा साई धरम तेज असे आहे. त्याने हैदराबादच्या नालंदा शाळेतून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने सेंट मेरी कॉलेजमधून पदवी संपादन केली. त्याने २०१४ साली तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. साई धरम तेजला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट कायम नसते. सुरुवातीला त्याला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम मात्र नंतर साई धरम तेजला मिळाले नाही. यशाने आपल्या करियरच्या सुरुवात करणाऱ्या साईला त्याच्या करियरमध्ये सर्वात मोठे अपयश पाहायला मिळाले. त्याने त्याच्या करियरमध्ये यश आणि अपयश दोन्ही पाहिले आहे.

चित्रपटाशी संबंधित कुटुंबात जन्मलेल्या साई धरम तेजला लहानपणापासूनच चित्रपटाचे वातावरण मिळाले. त्यामुळे साहजिकच तो चित्रपटांकडे वळाला. त्याची आई विजय दुर्गा या तेलुगू चित्रपट सुपरस्टार आणि राजकारणी चिरंजीवी यांची बहीण आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुन, राम चरण, अल्लू सिरीश, वरुण तेज आणि निहारिका कोनिदेला हे त्याचे चुलत भाऊ आहेत. साई धरम तेजचा धाकटा भाऊ वैष्णव तेज देखील तेलुगु चित्रपटसृष्टीत अभिनेता आहे.

साई धरमने २०१४ साली चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्याने तेलुगु चित्रपट ‘पिल्ला नीव लेनी जीविथम’ मधून पदार्पण केले. परंतु त्याने यापूर्वी २०१३ मध्ये ‘रे’ चे शूटिंग पूर्ण केले होते. पण काही कारणांमुळे हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. यानंतर, साई धरमने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने ‘सुब्रमण्यम फॉर सेल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ज्याला बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळाले.

अभिनेता साई धरम तेजच्या आयुष्यात एक काळ ज्यानंतर त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होत गेले. २०१६ मध्ये आलेला चित्रपट ‘थिक्क’हा फ्लॉप ठरला. त्यानंतर २०१७ मध्ये ‘विनर’, ‘नक्षत्रम’ , ‘जवान’ हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. २०१८ मध्ये त्याचे ‘तेज- आय लव्ह यू’ आणि ‘इंटेलिजंट’ हे चित्रपट ही फ्लॉप ठरले. त्याचे असे एकूण ६ चित्रपट सलग बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

पडद्यावर सलग ६ फ्लॉप दिल्यानंतर अभिनेता साई धरम तेजने २०१९ मध्ये ‘चित्रलहरी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. २०२० मध्ये, त्याचा ‘सोलो ब्रथुके सो बॅटर’ हा तेलुगु चित्रपट कोरोना महामारीच्या दरम्यान रिलीज झाला होता. ५० टक्के चित्रपटगृहे खुली असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या साई धरम तेजने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा त्याला पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या पुरस्कार देखील देण्यात आला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर एका चाहतीच्या वागण्यामुळे, ‘बिग बीं’चे वैवाहिक जीवन आले धोक्यात

प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा