Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड या अभिनेत्रींसोबत सैफची जोडी ठरली सुपरहिट; करीना नव्हे करिष्माचा यादीत समावेश …

या अभिनेत्रींसोबत सैफची जोडी ठरली सुपरहिट; करीना नव्हे करिष्माचा यादीत समावेश …

सैफ अली खानने मोठ्या पडद्यावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सैफची जोडी कोणत्या अभिनेत्रींसोबत हिट झाली याबद्दल अनेकदा चर्चा होते. सैफ अली खानच्या घरात हात घुसल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खानची जोडी ऑफ-स्क्रीन हिट जोडी आहे. 

राणी

सैफ अली खानने राणी मुखर्जीसोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘ता रा रम पम’, ‘हम तुम’, ‘थोडा प्यार’, थोडा मॅजिक’, ‘कल हो ना हो’ यांचा समावेश आहे.

प्रीती झिंटा

प्रीती झिंटाने सैफ अली खानसोबत बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘कल हो ना हो’, सलाम नमस्ते, क्या कहना, दिल चाहता है यांसारखे चित्रपट समाविष्ट आहेत.

विद्या बालन

‘परिणीता’ चित्रपटात सैफसोबत विद्या बालनची जोडी चाहत्यांना खूप आवडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. याशिवाय विद्या बालन २००७ मध्ये आलेल्या ‘एकलव्य’ चित्रपटात दिसली होती, जो बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही.

दीपिका पदुकोण

सैफ अली खानने दीपिका पदुकोणसोबत मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘रिझर्वेशन’, ‘रेस २’, ‘कॉकटेल’, ‘लव्ह आज कल’ सारखे चित्रपट समाविष्ट आहेत.

करिश्मा कपूर

सैफने करिश्मा कपूरसोबत अनेक हिट चित्रपट केले आहेत. यामध्ये ‘हम साथ साथ हैं’चा समावेश आहे. चाहत्यांना अजूनही हा चित्रपट पहायला आवडतो.

सोनाली बेंद्रे

सैफ अली खानने सोनाली बेंद्रेसोबत ‘ये मेरी जान’, ‘हमसे बधकर कौन’, असे चित्रपट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सलमान खान करणार मार्व्हल्सचा चित्रपट; मार्व्हल्स शील्डसोबतचा केला फोटो शेअर…

author avatar
Sankalp P

हे देखील वाचा