प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा शो म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखले जाते. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी आपल्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. विशेष म्हणजे यादरम्यान मजेशीर गप्पा- गोष्टी तर रंगतातच, परंतु यावेळी सेलिब्रिटी असे काही वक्तव्य, खुलासे करतात, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान कपिल शर्माच्या या शोमध्ये पोहोचला होता. सैफसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतमही उपस्थित होत्या. यादरम्यान ‘भूत पोलीस’ या आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना सैफ अली खानने अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या. यादरम्यान त्याने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबतही अनेक खुलासे केले.
कॉमेडियन कपिलने सैफशी ‘तांडव’ वेबसीरिजबाबतही चर्चा केली, ज्याची शूटिंग ‘पतौडी पॅलेस’मध्ये करण्यात आली आहे. कपिलने विचारले की, “तुम्ही अभिनेता म्हणून अधिक कमाई केली की, आपली संपत्ती भाड्याने देऊन?” कपिलच्या या प्रश्नावर सैफही हसू लागतो. तो म्हणतो की, “दोन्हीही.” यानंतर त्याने सांगितले की, वडिलोपार्जित घरातून येणारा सर्व पैसा शर्मिला टागोर घेतात. यावर सैफ म्हणाला की, “माझी आईच घेते ते सर्व, मी फक्त नावापुरता नवाब आहे.” (Actor Saif Ali Khan Said On The Kapil Sharma Show Main Sirf Naam Ka Nawab Hoon)
दुसरीकडे शोदरम्यान यामी गौतमने ‘भूत पोलीस’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुपर नॅचरल अनुभवांबाबतही भीतीदायक गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, “मसूरी येथे मी ज्या ठिकाणी थांबली होती. त्याबाबत सांगण्यात आले होते की, ते झपाटलेले आहे. टाईमपास करण्यासाठी आपल्या खोलीत द कपिल शर्मा शो पाहण्यासाठी टीव्ही लावला, तर चालत नव्हता. त्यानंतर फुल चार्ज असलेला आयपॅडवर पाहण्याचा प्रयत्न केला, तर तोही चालला नाही. त्यानंतर मी झोपण्याचा निर्णय घेतला आणि हात जोडून म्हटले की, ‘जर खरंच कोणी असेल, तर कृपया करून मला झोपू द्या. मला सकाळी लवकर उठायचंय.’ त्यानंतर मी झोपले. सकाळी उठले आणि माझी हेअरस्टायलिस्ट माझे केस ठीक करत होती, तेव्हा माझ्या केसात काहीतरी होते, ती जेव्हा कर्लिंग आयर्नचा वापर करत होती, तेव्हा ते वितळत होते. ते मेणबत्तीचे वॅक्स होते. मला माहिती नव्हते की, ते माझ्या केसांवर कसे आले. ते जवळपास १५ दिवस माझ्या केसांमध्ये होते.”
शोदरम्यान जॅकलिनला फ्लर्ट केल्यानंतर कपिलने सैफला विचारले की, “तुम्हाला जर विचारले की, मुलं-बाळं झाली आहेत, फ्लर्ट करणे बंद करा, तर तुम्ही यांना काय उत्तर देता?” यावर सैफ काहीच बोलला नाही. तेवढ्यात अर्चना पूरन सिंगने म्हटले की, “आधी तो करीनाला उत्तर देईल, त्यानंतर यांना.” हे ऐकून सैफ म्हणतो, “होय, याचे तर उत्तरच नाही.”
सैफ अली खान ‘बंटी और बबली २’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्याच्या ताफ्यात ‘आदिपुरुष’, ‘फायटर’ आणि ‘गो गोवा गॉन २’ यांसारख्या चित्रपटांचाही समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’