तमिळचा ‛विक्रम वेध’ या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक सध्या चर्चेत आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि सैफ अली खान या हिंदी रिमेकमध्ये एकत्र काम करत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे चाहतेही अचंबित झाले आहेत. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‛विक्रम वेध’ हा चित्रपट विक्रम वेताळ या ऐतिहासिक कथेवर आधारित आहे.
एका मुलाखतीमध्ये सैफसोबत अर्जुन कपूर उपस्थित होता. दरम्यान, यावेळी अर्जुनने ऋतिकच्या तुलनेत सैफच्या डान्स कौशल्याची खिल्ली उडवली होती. तेव्हा सैफ म्हणाला, “होय, हे खरे आहे की, जर मला ऋतिकसोबत डान्स करण्यास सांगितले गेले असते, तर मी कदाचित हा चित्रपट केला नसता.” तसेच, गेल्या १९ वर्षात सैफ आणि ऋतिक हे दोन मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. यापूर्वी दोघेही २००२ मध्ये ‘ना तुम जानो ना हम’ चित्रपटात दिसले होते. ज्यात ईशा देओल त्यांच्यासोबत दिसली होती.
अभिनेता सैफ याने म्हटले आहे की, जर त्याला या चित्रपटामध्ये हृतिकसोबत डान्स करण्यास सांगितले असते तर त्याने हा चित्रपट सोडला असता. सैफ अली खान याला ऋतिक रोशनचे खूप कौतुक आहे, पण तरीही तो ‘विक्रम वेध’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास नकार देऊ शकला असता. एका माध्यमाशी बोलताना सैफ म्हणाला, “आम्ही या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आहे आणि या स्क्रिप्टमध्ये अतिशय आव्हानात्मक भूमिका असणार आहे. ऋतिक एक उत्तम अभिनेता आणि डान्सर आहे. म्हणूनच मला सकाळी उठून त्याच्यासमोर उभे राहण्यासाठी कष्ट करावे लागत आहेत.”
‛विक्रम वेधा’ २०१७ साली प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटामध्ये अभिनेता आर माधवन आणि अभिनेता विजय सेथूपती यांनी मुख्य भूमिका साकारलेली होती. मात्र, याच्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिका साकारणार आहेत. तसेच, या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटाव्यतिरिक्त ऋतिक दीपिका पदुकोणसोबत ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे. सैफ अली खानबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘भूत पोलिस’ मध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त, सैफ ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारत आहे. ज्यामध्ये प्रभास राम आणि क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसतील.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’
-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज