आता बॉलिवूड स्टार्सही सैफ अली खानवरील हल्ल्याच्या मुद्द्यावर उघडपणे समोर आले आहेत. आता ट्विंकल खन्ना देखील या हल्ल्यावर बोलली आहे. सैफवरील हल्ल्यानंतर तीने करीना कपूर खानवर झालेल्या ट्रोलिंगबद्दल बोलले आहे.
ट्विंकल खन्नाने टाईम्स ऑफ इंडियासाठी एक कॉलम लिहिला आणि तिच्या कॉलममध्ये करीना कपूरचा बचाव केला. ती म्हणाली की अशा ‘मूर्ख अफवा’ होत्या की बेबो घटनेच्या वेळी घरी नव्हती किंवा ती तिच्या पतीला मदत करण्यासाठी ‘खूप मद्यधुंद’ होती. ट्विंकल खन्ना म्हणाली की लोकांना फक्त पत्नींना दोष देण्यात मजा येते. ट्विंकल खन्नाने विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दलही बोलले आहे. ती म्हणाली, “विराट कोहली आउट झाल्यावर अनुष्काला हुटिंगचा सामना करावा लागतो.”
ट्विंकल खन्ना म्हणाली की, हा पॅटर्न फक्त बॉलिवूड अभिनेत्रींसाठी नाही. ती म्हणाली की, पतींच्या वजन वाढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी पत्नींना जबाबदार धरले जाते. त्यांनी सांगितले की लोक त्यांच्या जोडीदाराच्या स्वभावासाठी आणि अगदी ‘टक्कल पडण्या’साठी त्यांच्या पत्नींना कसे दोष देतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अपघातानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सैफ अली खान; आता आशी आहे प्रकृती …