Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तब्बल १० एकरात पसरलेला वडिलोपार्जित ‘पतौडी पॅलेस’ पुन्हा विकत घेणार सैफ? वाचा काय म्हणाला

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या आपल्या आगामी ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलाच व्यस्त आहे. नुकतेच याबाबत चर्चा करताना सैफने माध्यमांशी बोलताना आपल्या वडिलोपार्जित राजवाडा आणि त्याच्या खर्चाबाबत मोकळेपणाने चर्चा केली. यादरम्यान त्याला पतौडी पॅलेस पुन्हा विकत घेण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावर सैफने महत्त्वाचे प्रत्युत्तर दिले आहे.

सैफने म्हटले की, “हे पॅलेस पुन्हा विकत घेण्याबाबत बोलणार नाही. मी फक्त त्याचे भाडे दिले आहे.” खरं तर हरियाणातील पतौडी येथे असलेला पतौडी पॅलेस जवळपास १० एकर इतक्या जागेत पसरला आहे. या पॅलेसमध्ये १५० पेक्षाही अधिक खोल्या आहेत. हे पॅलेस एका हॉटेल ग्रूपने भाडेतत्वावर घेतले होते, ज्याने सन २०१४ पर्यंत हे पॅलेस लक्झरी प्रॉपर्टी म्हणून ऑपरेट केले. (Actor Saif Ali Khans Reply On Re Buying The Pataudi Palace Says I Just Paid The Lease)

यादरम्यान सैफ म्हणाला की, “या देशात अर्ध्यापेक्षा अधिक व्यावसायिकांकडे वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि आमच्याकडे नाहीत. मात्र, आमच्याकडे त्या लोकांपेक्षाही अधिक विशेषाधिकार आहेत, जे खरोखरच गरीब आहेत.”

‘माझ्या वित्तीय समस्यांची तुलना केली जाऊ शकत नाही’
या चर्चेदरम्यान सैफ म्हणाला की, “मी आणि माझा सहकलाकार अर्जुन कपूर दोघांनाही आपापले अधिकार माहिती आहेत. आमचा असा विश्वास आहे की, आम्ही देशातील ९० टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक लोकापेक्षा चांगले असू. त्यामुळे आम्ही याचे महत्त्व जाणतो. माझ्या काही वित्तीय समस्या राहिल्या आहेत आणि आताही आहेत. मात्र, त्यांची तुलना अनेक लोकांशी केली जाऊ शकत नाही. कारण, जर मी असे केले, तर हे त्यांना हास्यास्पद वाटेल.”

हे देखील वाचा