प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने वेगवेगळ्या भूमिका साकारून आपले वेगळे नाव कमावले आहे. तो नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. केवळ सैफच नाही, तर त्याची मुलगी सारा अली खाननेही बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले एक स्थान निर्माण केले आहे. नुकतच आता सैफने त्याचा मुलगा इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती दिली आहे.
एका यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीदरम्यान सैफने टीव्ही होस्ट सिद्धार्थ कन्ननसोबत बोलताना असा खुलासा केला आहे की, त्याचा मुलगा इब्राहिम करण जोहरच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इब्राहिम आता चित्रपटात काम करण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकत असल्याची देखील माहिती सैफने दिली आहे.
इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत असताना सैफने असा देखील खुलासा केला आहे की, तो कॅमेऱ्याच्या मागे राहून चित्रपट निर्मितीची प्रक्रिया समजून घेत आहे. त्यामुळे असाही अंदाज लावला जाऊ शकतो की, कदाचित सैफ आपल्या मुलाला अभिनेता म्हणून लॉन्च करण्यासाठी याची तयारी करत आहे.
यादरम्यान, सैफ आपल्या चारही मुलांविषयी बोलला आहे. मुलांबद्दल बोलताना तो अस म्हणाला की, “त्याची चारही मुले वेगवेगळी आहेत. इब्राहिम करण जोहरला आपल्या आगमी चित्रपटात सहाय्य करत आहे.” तसेच आपल्या स्वप्नांबद्दल आणि विचारांबद्दल बोलला आहे. तो म्हणाला की, “सारा वयाने मोठी आहे आणि आमच्याकडे खूप वेगळी केमिस्ट्री आहे. अर्थात, तैमूरला वेळ आहे आणि जेह फक्त हसत आहे. त्यांच्यापैकी कोणाच्याही तुलनेत माझे मानसिक वय जास्त आहे.”
मात्र, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही की, इब्राहिम करण जोहरच्या कोणत्या चित्रपटात दिसणार आहे. अस देखील असू शकत की, हा चित्रपट निर्मात्याचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ असू शकतो. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर
-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण
-‘ही पाहा ऍटिट्यूडवाली आंटी…’, करीनाचे उद्धट वागणे पाहून नेटकऱ्यांची सुनावले तिला चांगलेच खडेबोल