बॉलिवूडमधील अनेेक कलाकारांची मुलं पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत. नुकतेच निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला बॉलिवूडमध्ये आणणार असल्याचे वृत्त आले होते. यानंतर आता तो नवाब सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानलाही बॉलिवूडमध्ये आणणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी तो इब्राहिमची ट्रेनिंग लवकरच सुरू करणार आहे.
नवीन वर्षात आपल्या कंपनीच्या नवीन उद्देशाबद्दल बोलताना करण जोहरने नुकतेच नवीन चेहऱ्यांना आपल्या चित्रपट, वेब सीरिज आणि डिजिटलध्ये लाँच करण्याची मोठ्या योजनेची घोषणा केली. चर्चेत असलेली टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी कॉर्नरस्टोनसोबत मिळून करण जोहरने ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी (डीसीए)’च्या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने आपला जुना मित्र राजीव मसंद यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे मसंद यांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांना निवेदन देण्यासाठीही हजर व्हावे लागले होते.
मसंद यांच्या येण्याने करणकडे आतापर्यंत तृप्ती डिमरी, गुरफतेह पीरजादा, ध्यैर्य करवा, लक्ष्य आणि शनाया कपूर या नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, करण नवीन वर्षात सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देईल, ज्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या घराण्यांशी कोणताही संबंध नसेल. परंतु त्याच्याकडे वर्षातील पाचव्या नवीन चेहऱ्याच्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या घराण्याशी संबंध असलेल्या कलाकाराचा समावेश झाला. सोमवारी करणने स्वत: शनाया कपूरच्या नावाची घोषणा केली. शनायाच्या या पहिल्या चित्रपटाला या वर्षी जुलैमध्ये सुरुवात होणार आहे.
करणच्या चित्रपटांमध्ये पैसा लावण्यासाठी लंडनचे व्यावसायिक अलीराजा सुभाषकरण तयार झाले आहेत. ते लायका मोबाईल कंपनी चालवतात. त्यांनी आतापर्यंत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गुंतवणूक केली आहे. करण जोहरच्या चित्रपटांसोबतचा करारही जवळपास पूर्ण झाला आहे. त्याचे नवीन चित्रपट जिओ स्टुडिओजची सहाय्यक कंपनी वायकॉम १८मार्फत रिलीझ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
करण जोहरच्या या पावसाळ्यात सुरू होणाऱ्या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असल्याचे म्हटले जात आहे. सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगचा मुलगा इब्राहिमही या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार आहे. असे वृत्त आहे की, इब्राहिम या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करेल. तरीही, धर्मा प्रॉडक्शनकडून याबाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अपेक्षा आहे की, कॅमेऱ्याच्या मागे बेसिक गोष्टी शिकल्यानंतर इब्राहिम कॅमेऱ्यासमोरही येईल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ
-मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता
-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक