बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणजे अभिनेता सलमान खान त्याच्या शर्टलेस अवतारसाठी ओळखला जातो. तो जेव्हा शर्ट काढतो, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतो. आता त्याच्या ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. गणपती बाप्पाच्या या गाण्यात सलमानचा ऍक्शन अवतार दिसला आहे आणि त्याचे जबरदस्त शरीरही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये त्याचे सिक्स पॅक ऍब्स देखील दिसून येत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
सलमान खान ‘अंतिम’ या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, तर त्याचा मेहुणा आयुष शर्मा हा गुंडाची भूमिका साकारणार आहे. ‘विघ्नहर्ता’ या गाण्यात सलमान खान येतो आणि आयुष शर्माला बेड्या ठोकून घेऊन जाताना दिसत आहे. याआधी आयुष आणि सलमान दोघेही शर्ट काढतात. दोघांचेही जबरदस्त शरीर आणि ऍब्स दिसून येत आहेत. मात्र, सलमान खानचा अंदाज त्याच्या चाहत्यांना भावला असून सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे.
यूट्यूबवर प्रदर्शित झालेल्या गाण्यात चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पाडला जात आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “जुना सलमान गोल्ड भाईजान आहे.” काही चाहत्यांना हे गाणं खूप आवडले आहे. त्याचबरोबर ते सलमानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “सलमान खान भाईजान लीजेंड.” अशाप्रकारे, त्याच्या या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनेता सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटातील पहिले ‘विघ्नहर्ता’ हे गाणं गायक अजय गोगावले याने गायले आहे. या गाण्याला हितेश मोडक याने संगीत दिले आहे. त्याचबरोबर या गाण्याचे बोल वैभव जोशी याने लिहिले आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा
-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?
-‘बिग बॉस १५’च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, टीव्हीची ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री घेणार सहभाग