बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस १५’ वीकेंड का वार एपिसोडमध्ये कॅटरिना कैफ आणि रोहित शेट्टी खास पाहुणे म्हणून दिसले. कॅटरिना आणि विकी कौशलच्या नात्याच्या आणि लग्नाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाच सलमान आणि कॅटरिनाच्या केमिस्ट्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कॅटरिनासाठी गायले रोमँटिक गाणे
यावेळी कॅटरिना कैफने निळ्या रंगाची साडी नेसली होती. सलमान अनेकदा शूटिंगला उशीर कसा करतो आणि कोरिओग्राफरच्या दिग्दर्शनाचे पालन करत नाही, हे उघड केले. याशिवाय कॅटरिनाने सलमानला तिच्यासाठी एक गाणे गाण्यास सांगितले. काही सेकंद विचार केल्यानंतर त्याने कॅटरिनासाठी बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक गाणे ‘चांद मेरा दिल’ गायले.
सलमानने गुन्ह्याची दिली कबुली
या संभाषणात जेव्हा कॅटरिनाने सलमानचा आळशीपणा आणि रिहर्सल डान्स रूटीन फॉलो करताना त्याच्या कमतरतेबद्दल खुलासा केला तेव्हा सलमाननेही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तो म्हणाला की, “मी हा गुन्हा कबूल केला आहे!” त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा भोगण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर कॅटरिनाने सांगितले की, तिच्या डोळ्यात पाहत तिने ३० सेकंद त्याची स्तुती केली पाहिजे.
शमिताची घेतली शाळा
सलमान स्पर्धक शमिता शेट्टीवर भडकताना दिसला. व्हिडिओमध्ये सलमान तिला ‘शीश महल की रानी’ म्हणत आणि तिची शाळा घेताना दिसत आहे. सलमानच्या बोलण्याने शमिताही नाराज झाली आणि तिने उत्तर दिले, “मी काय करू? जर माझा असा जन्म झाला असेल. मी तुला सांगू सलमान या घरात खूप काम मी करते.”
शमिता शेट्टीबद्दल बोलायचे झाले, तर २००० साली ‘मोहब्बतें’मधून पदार्पण केल्यानंतर ती ‘झलक दिखला जा’, ‘फियर फॅक्टर’, ‘खतरों के खिलाडी-९’मध्येही दिसली होती. शमिता गेल्या वर्षी ‘ब्लॅक विडोज’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कॅटरिना कैफने सलमान खानवर लावले ‘हे’ आरोप, अभिनेत्याची प्रतिक्रियाही होती बघण्यासारखी
-रोहित शेट्टीने रणवीर सिंगला ‘सूर्यवंशी’मधून रोल कट करण्याची दिली धमकी, काय आहे प्रकरण?










