Thursday, June 12, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला

बॉलिवूडवर शोककळा! सलमान खानच्या बॉडी डबलचे निधन, ‘भाईजान’ही हळहळला

कलाविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. सुपरस्टार सलमान खान याचा बॉडी डबल सागर पांडे याचे निधन झाले आहे. तो 50 वर्षांचा होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, राजू श्रीवास्तव याच्यासारखेच जिममध्ये वर्कआऊट करताना सागर याला हृदयविकाराचा झटका बसला आणि त्यातच त्याचे निधन झाले. सागर हा सोशल मीडियावरही खूपच सक्रिय होता. त्याच्या निधनानंतर सलमान खानसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. तो सलमान खानची कार्बन कॉपी म्हणून प्रसिद्ध होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान खान याचा बॉडी डबल सागर पांडे (Salman Khan Body Double Sagar Pandey) हा इंडस्ट्रीत बॉडी डबल म्हणून काम करत होता. शुक्रवारी (दि. 30 सप्टेंबर) जिममध्ये वर्कआऊट करताना त्याच्या छातीत त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याला मृत घोषित केले.

अभिनेता सलमान खान यानेही सोशल मीडियावरून सागर पांडे याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझ्यासोबत कायम असल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. सागर भाऊ तुझ्या आत्म्याला शांती लाभो. धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

दुसरीकडे, सोशल मीडियावर भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) हिने पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dubey Aamrapali ???? (@aamrapali1101)

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोडले प्राण
सागर पांडे (Sagar Pandey) याला जिममध्ये उपस्थित लोकांनी मुंबईच्या पश्चिम जोगेश्वरीतील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर म्युनिसिपल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याने प्राण सोडले होते.

कोण होता सागर पांडे?
सागर पांडे हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. तो सलमान खानप्रमाणे हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईत आला होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर जेव्हा त्याला काम मिळाले नाही, तेव्हा त्याने बॉडी डबल म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तो आपल्या आवडत्या सलमान खानप्रमाणेच अविवाहित होता. त्याला 5 भाऊ होते आणि तोच घर सांभाळायचा.

अशी केली होती कारकीर्दीची सुरुवात
सागर पांडे याने 1998मध्ये बॉडी डबल म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने ‘दबंग’, ‘दबंग 2’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्यूबलाईट’ यांसारख्या जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले होते. लॉकडाऊनदरम्यान त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, काम न मिळाल्यामुळे त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.

सागर पांडेच्या निधनामुळे कलाविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, सलमान खान याचा बॉडी डबल म्हणून प्रसिद्धी मिळवणारा सागर चाहत्यांच्या स्मरणात कायम राहील.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
भांडं फुटलं रे! अनन्या की रश्मिका, कुणाला डेट करतोय विजय देवरकोंडा? करण जोहरने स्पष्टच सांगितलं
राडाच! खरोखरची बंदूक चालवून ‘रॉकी भाई’ने दाखवला जलवा, व्हिडिओ पाहून चाहत्याला आठवली ‘केजीएफ’ची ‘कलाशनिकाव’

हे देखील वाचा