Tuesday, April 15, 2025
Home बॉलीवूड सलमानने चाहत्यांसोबत ‘हे’ बरं नाही केलं, अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा ‘भाईजान’ने मोडली

सलमानने चाहत्यांसोबत ‘हे’ बरं नाही केलं, अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा ‘भाईजान’ने मोडली

अभिनेता सलमान खान सध्या खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, तेव्हापासून तो तुफान खूपच चर्चेत आहे. यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेची खूप जास्त काळजी घेतली जात आहे. नेहमी ईदच्या खास क्षणी सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर येऊन चाहत्यांची शुभेच्छा देत होता. मात्र, यावर्षी चाहत्यांना आपल्या भाईजानला पाहता आले नाही. सलमानने त्याची दरवर्षीची प्रथा मोडली आहे. आता यामागील कारण समोर आले आहे.

ईदच्या खास क्षणी सलमान खान (Salman Khan) याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर हजारो चाहते त्याची वाट पाहत असतात. मात्र, त्याला यंदा ते भाग्य लाभले नाही. आता सुरक्षिततेच्या कारणामुळे सलमान खानला त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत.

यामुळे सलमान आला नाही घराबाहेर
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हापासून सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तेव्हापासून तो सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळतो. वृत्तानुसार, त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दहा स्पेशल फोर्स ऑफिसर्स तैनात करण्यात आले आहेत. तसेच, १५ सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. स्पेशल फोर्स ऑफिसर्स सलमानसोबत सेटवरही जातात.

सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा
सलमान खान याने ईदच्या खास क्षणी सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने ईदच्या दिवशी ट्वीट करत लिहिले होते की, “सर्वांना ईदनिमित्त खूप सारे प्रेम, शांती आणि चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करतो.”

सलमानचे आगामी सिनेमे
सलमानच्या आगामी कामाबाबत बोलायचं झालं, तर सलमान लवकरच ‘कभी ईद कभी दिवाली’ या सिनेमात झळकणार आहे. तो सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याव्यतिरिक्त सलमान खान ‘टायगर ३’ या सिनेमात कॅटरिना कैफ हिच्यासोबत झळकणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी हादेखील दिसणार आहे. तसेच, सलमानच्या सिनेमांच्या यादीत ‘गॉडफादर’, ‘किक २’, ‘वेड’ हे सिनेमेही आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्टसोबत कसे वाटते रणबीरने सांगूनच टाकले; काय म्हणाला एकदा वाचाच

काय सांगता! सोनम कपूरने दिला चिमुकल्याला जन्म? सोशल मीडियावर फोटोची रंगलीय एकच चर्चा

‘खतरों के खिलाडी’मध्ये भिडल्या प्रसिद्ध अभिनेत्री; एकीच्या चाहत्यांनी दुसरीला म्हटले, ‘घमंडी’

हे देखील वाचा