Monday, July 1, 2024

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आपल्या चित्रपटातील जबरदस्त अभिनयासाठी, तसेच त्याच्या दबंग स्टाइलसाठी ओळखला जातो. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीत सलमान खानचा देखील समावेश आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या चाहत्यांना नेहमीच त्याच्या चित्रपटांसह त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. तो आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. त्याच्या कुटुंबातील त्याच्यासाठी असणारी खास व्यक्ती म्हणजे त्याची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मावर तो खूप प्रेम करतो. जरी अर्पिताच लग्न झाले असले, तरी देखील तो तिची खूप काळजी घेतो. तिच्या लग्नानंतरही ती अगदी राजकुमारीसारखी राहते.

सलमानने अर्पिताच्या लग्नानंतर तिला कोट्यावधीच्या भेटवस्तू दिल्या होत्या. ज्यात अर्पिताचे आलिशान घरही आहे. ज्यात ती पती आयुष आणि मुलांसोबत राहते. सलमानने अर्पिताला लग्नाची भेट म्हणून पनवेलमध्ये १५० एकर फार्म हाऊस गिफ्टमध्ये दिले होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा अर्पिता पती आयुषसोबत मुंबईत राहायला आली, तेव्हा सलमानने तिला एक सुंदर फ्लॅट भेट म्हणून दिला होता. अर्पिताचा हा फ्लॅट बांद्रा येथील कार्टर रोडवर बांधण्यात आला आहे, जो सलमानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या अगदी जवळ आहे. सलमानने हा फ्लॅट १६ कोटींना खरेदी केला होता.

अर्पिता पती आयुष आणि मुलासह या फ्लॅटमध्ये आनंदी जीवन जगत आहे. अर्पिताने तिचा लिविंगरूम पांढऱ्या आणि निळ्या झुंबर लावून सजवला आहे. अर्पिता गणपती बाप्पाची भक्त आहे. ती दरवर्षी घरात गणपतीचे स्वागत करते. ते गणपतीचे मंडप सुंदर सजवतात. अर्पिताने घरात विविध ठिकाणी गणपतीच्या मूर्ती बसवल्या आहेत. अर्पिताच्या घराचा टेरेस खूप सुंदर आहे, जो तिने झाडे लावून सजवला आहे. आयुषला टेरेसवर जास्तीत जास्त वेळ घालवायला आवडतो.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सलमान खान शेवटचा ‘राधे’ या चित्रपटातमध्ये दिसला होता. सलमान खान आता लवकरच ‘अंतिम’ आणि ‘टायगर ३’ चित्रपटात दिसणार आहे. ज्यात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा