Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमान खानने सर्वांसमोर केलं विशाल कोटियनच्या गर्लफ्रेंडला किस! अभिनेता म्हणाला ‘आता मला…’

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) नुकताच ‘बिग बॉस १५’ हा रियॅलिटी शो पूर्ण झाला आहे. सलमानने अलीकडेच ‘बिग बॉस १५’ ची ‘आफ्टर पार्टी’ आयोजित केली होती. ज्यामध्ये या सीझनमधील सर्व स्पर्धकांनी हजेरी लावली होती. विशाल कोटियन (Vishal Kotian) देखील गर्लफ्रेंड पायल शेट्टीसोबत सामील झाला होता. पायल सलमानला भेटण्यासाठी खूप उत्सुक होती. त्याचवेळी सलमानने पायलला किस केली. पायलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमानसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्याचवेळी तिने कॅप्शनमध्ये ‘ओम शांती ओम’ मधील गाण्याची ओळही लिहिली आहे.

पायलने लिहिले की, “आई ऐसी रात है जो बहुत खुशनसीब है। चाहे जिसे दूर से दुनिया, वो मेरे करीब है. सलमान खान खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रेमाने आणि प्रेमळ शब्दाने माझे मन भरून आले. मी तुमची खूप आभारी आहे.” पायल शेट्टीच्या या पोस्टवर प्रियकर विशाल कोटियनने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विशालने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
विशाल कोटियनने लिहिले की, “असे दिसते आहे की, मला आता अजय देवगण व्हावे लागेल.” या कमेंटमध्ये विशाल ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाचा संदर्भ देत होता. ज्यामध्ये सलमानशिवाय ऐश्वर्या राय आणि अजय देवगण दिसले होते. चित्रपटातील अजय देवगणचे पात्र त्यांना पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेते. जेव्हा त्याला कळते की, त्याची पत्नी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे. या चित्रपटात ऐश्वर्याने नंदिनी, तर सलमानने तिच्या प्रियकर समीरची भूमिका केली होती.

कोण आहे पायल शेट्टी?
विशाल कोटियननेही सलमानसोबतचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आणि लिहिले की, “ही आहे माझी बिग बॉस १५ ची ट्रॉफी. या प्रवासातून मी हे साध्य केले आहे. मला भाईजानकडून मिळालेल्या अफाट प्रेमाची तुलना नाही.” पायल शेट्टीबद्दल बोलायचे झाले, तर ती टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायल शेट्टीने संस्कृत भाषेतील ऐतिहासिक नाटक ‘शाकुंतलम’मध्ये काम केले आहे. ती कथ्थक डान्सर आहे. मॉडेल म्हणून तिने अनेक डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा