Saturday, June 29, 2024

जेव्हा सलमान करण जोहरला म्हणाला होता, ‘कुछ कुछ होता है’मध्ये सहाय्यक भूमिका कोणी वेडाच साकारेल

असे म्हणतात की, या ग्लॅमर जगात कोणीच कोणाचा मित्र नसते ना कोणी शत्रू. इथे फक्त कामापुरतीच नाती जोडल्या जातात आणि काम झाले की तू कोण? आणि मी कोण? अशीच वागणूक सर्वांची असते. मात्र या विधानाला देखील बरेच अपवाद आहेत. इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक मैत्रीच्या जोड्या आहेत, ज्या एखाद्या सख्या नात्याला देखील लाजवतील. बॉलिवूडमधील असाच एक यारो का यार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. आजपर्यंत आपण सलमानच्या मैत्रीचे, मदतीचे अनेक किस्से ऐकले असतील. सुखात जरी सलमान सोबत नसला तरी दुखत तो नेहमी सोबत असतो असेच म्हटले जाते. त्यामुळे सलमान त्याच्या मित्रांसाठी काहीही करायला तयार असतो. असाच एक किस्सा दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने नुकताच इंडियन आयडलच्या सेटवर केला आहे. हा किस्सा आहे त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा सिनेमा असलेल्या ‘कुछ कुछ होता हैं’ या चित्रपटाशी निगडित.

या शोमध्ये त्याने सांगितले की, “मी ‘कुछ कुछ होता हैं’साठी शाहरुख आणि काजोल यांना साइन केले. त्यानंतर मी या चित्रपटातील सहायक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी कलाकाराच्या शोधात होतो. मी अनेक कलाकारांशी ही भूमिका करण्याबद्दल विचारणा केली, मात्र सर्वांनीच शाहरुख खानसोबत सहायक भूमिका करायला मला नकार दिला. मी खूप टेन्शनमध्ये होतो. अशातच एक दिवस मी रात्री चंकी पांडेच्या घरी पार्टीसाठी गेलो होतो. तिथे मी जरा नाराजच होता तेव्हा माझ्याजवळ सलमान खान आला आणि म्हणाला, ‘तू शॉपिंग केली का?’, मी म्हणालो, ‘शॉपिंग?’ त्यावर तो म्हणाला, ‘हो, तू गेला ना सर्वांकडे. ती शॉपिंगच तर होती ना. मात्र हा चित्रपट करायला कोणीतरी वेडाच पाहिजे आणि तो वेडा मी आहे.’ (supporting role in kuch kuch hota hai)

यावर करण म्हणाला, ‘ मी तर या भूमिकेसाठी सलमान खानच्या नावाचा विचार देखील केला नव्हता, कारण तो तेव्हा मोठा सुपरस्टार होता. त्यामुळे त्याचे बोलणे ऐकून मी मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे सिनेमाची कहाणी ऐकवायला गेलो. पहिला भाग ऐकून तो म्हणाला, ‘खूपच छान मी हा सिनेमा करतोय.’ सलमानचे बोलणे ऐकून मी घाबरलो मला वाटले की सलमान खानला असे वाटत आहे, की मी त्याला शाहरुख खानची भूमिका ऑफर करत आहे. मी त्याला म्हटले की, अजून तुझा रोल तर मी तुला ऐकवलाच नाही. तो दुसऱ्या भागात सुरु होतो. त्यावर सलमान म्हणाला, ‘मला काहीही फरक पडत नाही. मी तुझ्या वडिलांना ओळखतो. त्यांच्यासाठी हा सिनेमा मी करणार आहे.’ तेव्हा मला खूपच आनंद झाला. त्यानंतर जेव्हा ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपट आला आणि तुफान हिट झाला तेव्हा मी सलमानच्या घरी त्याला धन्यवाद म्हणायला देखील गेलो होतो.’

मुख्य बाब म्हणजे या सिनेमासाठी सलमान खानला सर्वोत्कृष्ट सहायक भूमिकेचा फिल्मफेयर पुरस्कार देखील मिळाला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा