Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड कॅटरिना अन् विकीच्या लग्नात सामील नाही होणार सलमान खान; ‘या’ दिवशी पार पडणार विवाहसोहळा

कॅटरिना अन् विकीच्या लग्नात सामील नाही होणार सलमान खान; ‘या’ दिवशी पार पडणार विवाहसोहळा

बॉलिवूड विश्वात सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून, अनेक बॉलिवूड कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. सध्या विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नाच्या बातम्या खूप चर्चेत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघेही ७ ते ९ डिसेंबर दरम्यान विवाहबंधनात अडकतील. सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे दोघांच्या लग्नाचे बुकिंग करण्यात आले असून, तयारी व्यवस्थित सुरू आहे की नाही, हे पाहण्यासाठी दोघांची टीम जयपूरला पोहोचल्याचीही माहिती समोर येत आहे. लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार आहेत.

सलमान खान लग्नात राहणार नाही उपस्थित
माध्यमांतील वृत्तांनुसार, सुपरस्टार सलमान खान आपल्या कुटुंबासह या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार नाही. लग्नाचे पहिले निमंत्रण सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आल्याचेही बोलले जात आहे. कॅटरिनाचे सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध आहेत, हे सर्वांना माहित आहे. चांगल्या किंवा वाईट अशा दोन्ही काळात सलमान नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. या लग्नात अनेक लोक सामील होणार आहेत. हे दोन्ही कलाकार इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांना आणि मार्गदर्शकांना बोलावणार आहेत. या यादीत करण जोहर, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथूर आणि रोहित शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय वरुण धवन आणि नताशा दलालही लग्नाला उपस्थित राहू शकतात.

कबीर खान यांच्या घरी झाला होता रोका
बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या कॅटरिना आणि विकीचा रोका दिवाळीच्या दिवशी दिग्दर्शक कबीर खान यांच्या मुंबईतील घरी पार पडला. कॅटरिना कबीर खानच्या खूप जवळ आहे आणि त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. कबीर हे तिचे राखी भाऊ आहेत. विकी आणि कॅटरिनाच्या कुटुंबातील सदस्यांनी रोका सोहळ्याला हजेरी लावली होती. रोका सोहळा छान पार पडला, असे या जोडप्याच्या जवळच्या मित्राने सांगितले. घराची सजावट फक्त लाईट्सने करण्यात आली होती आणि लेहंग्यात कॅटरिना खूपच सुंदर दिसत होती.

विकी आणि कॅटरिना कैफ जिथे लग्न करणार आहेत. तो किल्ला ७०० वर्षे जुना आहे आणि माध्यमांतील वृत्तांनुसार, तिथे एका रात्रीसाठी ९० हजार रुपये मोजावे लागतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भन्साळींच्या घरी जेवताना दीपिकाने रणवीरकडे प्रेमाने केली ‘ही’ विनंती, वाचा ‘दीपवीर’च्या पहिल्या डेटचा किस्सा

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ

हे देखील वाचा