सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुळ मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांच्या एकमेकांविरोधातील कुरघोड्याच पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होणाऱ्या इडीच्या कारवाया आणि त्याविरोधात त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदा याच बातम्या माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. सोबतच भोंगे हटवण्याची मागणी आणि त्याविरोधात सुरू असलेली चिखलफेक यामुळे जनतेच्या हिताचे मुद्दे पाहायला कुणाकडेही वेळ राहिला नाही महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेचे प्रश्न बाजुला पडले आहेत याच विदारक परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठकने (Sandip Pathak) सणसणीत टीका केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, संदीप पाठक हा मराठी नाटक आणि चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपट जगतात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसत असतो. सध्या संदीप पाठकची अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने राज्यातील टिकाटिपणीचे राजकारण आणि त्यामुळे त्रस्त झालेली जनता यावर उघड भाष्य केले आहे संदीप पाठकने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट केली आहे.
सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही.महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या………..
— Sandeep Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) April 15, 2022
ज्यामध्ये त्याने “सर्व राजकीय नेते आपआपसात भांडत आहेत. परंतु एकही पक्ष किंवा एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल एक चकार शब्द बोलत नाही.महागाई, वीजटंचाई, पाणी समस्या..” असे म्हणत राज्याच्या राज्यकारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, संदीप पाठकने आपल्या अभिनय कारकिर्दिला नाटकांमधून सुरूवात केली होती. आपल्या प्रतिभावान अभिनयासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. त्याचे ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ या नाटकाला जगभरातून प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. २००४ मध्ये त्याने श्वास चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा पाऊल ठेवले. येड्याची ‘जत्रा’,’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘भुताचा हनीमून’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा