Friday, July 5, 2024

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संजय दत्तने पत्नी मान्यताच्या पायाला केली मालिश, चाहते म्हणाले ‘लगे रहो मुन्ना भाई’

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि मान्यता दत्त हे बॉलिवूडमधील क्यूट कपल्सपैकी एक आहे. दोघेही चाहत्यांना खूप आवडतात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि क्वालिटी टाइमचे फोटो शेअर करत असतात. नुकतीच दोघांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मान्यताने एक सुंदर व्हिडिओ शेअर केला असून, या खास प्रसंगी संजय दत्तला शुभेच्छा दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये संजय (Sanjay Dutt) पत्नी मान्यताच्या पायाची मालिश करताना दिसत आहे. पती-पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नीच्या पायाला मसाज करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. मान्यता दत्तने हा व्हिडिओ शेअर केला असून, चाहतेही या व्हिडिओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून एका चाहत्याने लिहिले की, “लगे रहो मुन्ना भाई.”

हा व्हिडिओ शेअर करताना मान्यता दत्तने लिहिले की, “माझे सर्व चांगले दिवस तुझ्यासोबत घालवले आहेत. हॅपी एनिवर्सरी.” एका चाहत्याने लिहिले आहे की, “बाबा खूप हळव्या मनाचे व्यक्ती आहेत.” तर दुसऱ्या एका चाहत्याने त्याला लिजेंड म्हटले आहे. एका चाहत्याने अतिशय मजेशीर कमेंट करत “संजय दत्त असो, वा कोणी बायकोचे पाय तर दाबावेच लागतात” असे लिहिले आहे.

संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. दोघांनी २००८ मध्ये लग्न केले होते. दोघांना दोन मुले आहेत. या नात्यासाठी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. लग्नानंतर संजय दत्तने काही वर्षे तुरुंगात काढली. पण मान्यता दत्तने कुटुंबाची काळजी घेतली आणि आज दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी जोडप्यांपैकी एक आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर संजय दत्तकडे त्याच्या आगामी प्रोजेक्टचा भाग म्हणून ‘तुलसीदास ज्युनियर’, ‘शमशेरा’ आणि बहुप्रतिक्षित ‘केजीएफ चॅप्टर २’ आहेत. अशातच संजय दत्तचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशाप्रकारे संजय दत्त आगामी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा