Tuesday, January 13, 2026
Home मराठी झी मराठीवरील ‘या’ मालिकेत तिहेरी भूमिकेत झळकणार संकर्षण कऱ्हाडे, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

झी मराठीवरील ‘या’ मालिकेत तिहेरी भूमिकेत झळकणार संकर्षण कऱ्हाडे, चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

सध्या झी मराठी या वाहिनीवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अनेक मोठे कलाकार टेलिव्हिजनवर उतरताना दिसत आहेत. नवीन मालिकांचे प्रोमो आणि टिझर प्रदर्शित होत आहेत. यातून मालिकांच्या कथेची आणि कलाकारांची ओळख पटत आहे. अशातच ‘माझी तुझी रेशीगाठ’ या मालिकेत श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या मालिकेत आणखी एक लोकप्रिय अभिनेता दिसणार असल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे ही मालिका बघणे खूपच रंजक ठरणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयश तळपदे यांच्यासोबत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे देखील असणार आहे. अजूनही प्रोमोमध्ये त्याचा चेहरा दिसलेला नाही किंवा त्याने देखील सोशल मीडियावरून या गोष्टींची माहिती दिलेली नाही. पण तो या मालिकेत येणार असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. (actor sankarshan karhade will appear in majhi tujhi reshimgath serial)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता, सूत्रसंचालक आणि लेखक या तिहेरी भूमिका संकर्षण निभावणार आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एका अभिनेत्यासोबत फोटो शेअर केला होता. पण त्याने त्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावर इमोजी लावली होती. तसेच हा अभिनेता कोणता आहे आणि कोणती मालिका आहे आहे हे प्रेक्षकांना ओळखण्यास सांगितले होते.

त्यांच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचे तीन प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. जे प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडले आहेत. या प्रोमोमधील लहान मुलगी तर सर्वांना खूपच भावली आहे. मायरा वैकुळ हिचा अभिनय पाहून प्रेक्षक आता तिला दररोज मालिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. ही मालिका झी मराठीवर २३ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ८: ३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी पूर्ण केले वचन; बिग बींचा ‘चेहरे’ ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार रिलीझ

-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’

-मुली जान्हवी अन् खुशीसाठी खूपच पझेसिव्ह होत्या श्रीदेवी; तर लग्नानंतर ‘या’ कारणामुळे गेल्या त्या चित्रपटसृष्टीपासून लांब

हे देखील वाचा