दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते सत्यजीत यांचे रविवारी (१० ऑक्टोबर) निधन झाले आहे. त्यांनी बेंगळुरू येथील एका रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते वाढत्या वयाच्या आजाराने त्रस्त होते. ते आपल्या मागे दोन मुले आणि एक मुलगी सोडून गेले आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी, अभिनेते सत्यजीत यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर बोरिंग रुग्णालयात उपचार सुरू होते. या ठिकाणी ते बऱ्याक काळापासून आयसीयूमध्ये होते. मात्र, त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (०७ ऑक्टोबर) अभिनेत्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांचे डायलिसिस करण्यात आले होते. यादरम्यान त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले होते. त्यांच्यावर रविवारी (१० ऑक्टोबर) अंत्यसंस्कार केले जातील. (Actor Satyajit Passed Away At The Age of 72)
सत्यजीत यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यासोबतच नेतेमंडळीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. राजकारणी सुमलता अंबरीश यांनी फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ज्येष्ठ अभिनेते सत्यजीत यांच्या निधनाचे खूप दु:ख आहे. एक कलाकार म्हणून त्यांनी ‘मंडयादा गंडू’सह ६५० पेक्षा अधिक चित्रपटात काम करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन केले होते. मी प्रार्थना करतो की, त्यांच्या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो.”
अभिनेते सत्यजीत यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचे खरे नाव हे सैयद निजामुद्दीन हे होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी तब्बल ६५० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. यातील त्यांनी बऱ्याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली होती.
त्यांनी ‘अरुण राग’, ‘एंथम थीरपू’, ‘रानारंगा’, ‘नम्मुरा राजा’, ‘युद्धकांड’, ‘इंद्रजीत’, ‘नाममूरा हम्मीरा’, ‘पुलिस लॉकअप’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तब्येत बिघडल्याने त्यांनी चित्रपटांपासून विश्रांती घेतली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\
-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल
-आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद










