Monday, July 1, 2024

वयाच्या ५६व्या वर्षीही ‘फिट अँड फाईन’ आहे शाहरुख, बाथरूममध्येच शर्टलेस झाला ‘किंग खान’

जसे वय वाढते, तसे वयानुसार शरीरात बदल होत जातात. कलाकार स्वत:वर वयाचा परिणाम दिसू नये यासाठी काळजी घेतात. त्यापैकीच एक आहे बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान होय. शाहरुख त्याच्या बॉडी आणि फिटनेसवर खूप लक्ष देतो. आता पुन्हा एकदा शाहरुखचा शर्टलेस अंदात पाहायला मिळाला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बाथरूममध्ये शर्टलेस झाला शाहरुख खान
खरं तर, इंस्टाग्रामवर शाहरुखचा एका जाहिरातीचा व्हिडिओ धमाल करत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत शाहरुख खान बाथरूममध्ये शर्टलेस दिसत आहे. बॉडीवॉश करण्याच्या जाहिरातीत शाहरुखने त्याची बॉडीची झलकही दाखवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Godrej magic (@godrejmagic)

जोरात व्हायरल होतोय व्हिडिओ
शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी शाहरुखच्या या जाहिरातीच्या व्हिडिओला त्याच्या शर्टलेस स्टाईलमुळे भरपूर लाईक आणि शेअर करत आहेत. यासोबतच व्हिडिओवर अनेक कमेंट्सही केल्या जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले की, “शाहरुख नेहमीप्रमाणे तरुण दिसत आहे.” दुसर्‍या एका युजरने लिहिले की, “व्वा, उत्तम उपक्रम, उत्तम संकल्पना, आम्हाला एक झलक दिल्याबद्दल धन्यवाद.” खरं तर, शाहरुखने नुकतेच भारतीय चित्रपटसृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली.

‘पठाण’ सिनेमातून दमदार पुनरागमन
सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘पठाण’ या सिनेमातून शाहरुख खान पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीदेखील दिसणार आहे. दीपिका आणि शाहरुख यांनी अनेक सिनेमात काम केले आहे. त्यांचा मागील एकत्र सिनेमा ‘चेन्नई एक्सप्रेस’ होता. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा पठाणमधून मोठ्या पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे, शाहरुख ‘पठाण’नंतर तमिळ चित्रपट निर्माता ऍटली याच्यासोबत ‘जवान’मध्ये काम करणार आहे. सिनेमाच्या पहिल्याच टिझरमध्ये शाहरुख वेगळ्याच अवतारात झळकला होता. आता तो ‘जवान’ सिनेमा २ जून, २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखच्या या दोन्ही सिनेमासाठी चाहते खूपच आतुर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

न्यूड लूकमध्ये घरातून बाहेर पडली मलायका, अभिनेत्रीला पाहताच ‘काका’ही झाले आऊट ऑफ कंट्रोल

अरे बाप रे! लोकसंख्येत वाढ होऊ नये म्हणून रामचरणच्या पत्नीला नकोय मूल, वाचा सविस्तर

‘जिवाची होतीया काहिली’च्या शूटिंगला महाराष्ट्रात नाही, तर ‘या’ ठिकाणी सुरुवात, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

हे देखील वाचा