Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी हॉलिवूडमध्ये मारलीय आर्यन खानने एन्ट्री, ‘या’ चित्रपटात केलंय काम

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी हॉलिवूडमध्ये मारलीय आर्यन खानने एन्ट्री, ‘या’ चित्रपटात केलंय काम

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने रविवारी मुंबई हायप्रोफाईल अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर आर्यनला न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला एक दिवसासाठी एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे आर्यन खान रुपेरी पडद्यावर कधी पाऊल ठेवेल, या प्रश्नाचे उत्तर लाखो चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. मात्र, तो कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसण्यापूर्वीच, एका अंमली पदार्थाच्या प्रकरणात अडकला आहे. आर्यन खान अद्याप कोणत्याही हिंदी चित्रपटात दिसला नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का की, त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी हॉलिवूड चित्रपटात व्हॉईस ओवर आर्टीस्ट म्हणून पदार्पण केले आहे.

या चित्रपटात केलंय काम
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने वडिलांसोबत ‘द लायन किंग’ चित्रपटासाठी आवाज दिला. दोघांचे काम खूप पसंत केले गेले आणि आर्यन खानचे देखील या कामासाठी खूप कौतुक झाले. जॉन फेवरू दिग्दर्शित या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरुख खान आणि आर्यन खान यांनी आवाज दिला.

वडिलांना करत होता मदत
परदेशाव्यतिरिक्त, या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. आर्यन खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘पठाण’ चित्रपटासाठी आपल्या वडिलांना मदत करत होता. माध्यमांतील वृतानुसार, आर्यन खान ‘पठाण’ चित्रपटाच्या ऍक्शन सिक्वेन्समध्ये किंग खानला मदत करत होता.

सुपरस्टारसारखी आहे लोकप्रियता
शाहरुख खान स्वतः त्याच्या मुलाकडून या चित्रपटाच्या ऍक्शन सीक्वेन्ससाठी टिप्स घेत होता. जेणेकरून तरुण प्रेक्षक चित्रपटाच्या सीनशी संबंधित होऊ शकतील. चित्रपटात अभिनय न करता, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टारसारखी आहे. इतर स्टारस्किड्सप्रमाणे त्याचे देखील मोठ्या प्रमाणात चाहते आहे. त्याच्या फॅन फोलोविंगबद्दल बोलायचं झालं, तर केवळ इंस्टाग्रामवर १५ लाखांहून अधिक लोक आर्यन खानला फॉलो करतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा