Monday, July 1, 2024

संगीताची परंपरा असूनही शाहबाझ खान यांनी ‘या’ कारणामुळे स्वीकारले अभिनय क्षेत्र, वाचा त्यांचा प्रवास

सुरुवातीच्या काळात छोट्या पडद्यावर झळकणाऱ्या मालिका पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठीव जणू पर्वणीच होती. या काळात ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘चंद्रकांता’, ‘टिपू सुल्तान’, विक्रम वेताल अशा अनेक कार्यक्रमांनी त्याकाळात लोकप्रियता मिळवली होती. याच चंद्रकांता मालिकेतील कुंवर सिंगच्या भूमिकेने अभिनेता शाहबाज खानला प्रचंड  लोकप्रियता मिळाली. अभिनेता शाहबाज खानचा आज ( १० , मार्च)  वाढदिवस जाणून घेऊ या त्याच्याबद्दल.  

अभिनेता शाहबाज खान (Shahbaz Khan)  हा हिंदी मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जातो. त्याच्या दमदार अभिनयाचे, भूमिकांचे नेहमीच कौतुक होत असते. अभिनयात प्रसिद्ध झालेल्या शाहबाजच्या घरात मात्र संगीताचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कारण त्याचे वडील उस्ताद आमीर खान हे त्या काळातील संगीत  क्षेत्रातील मोठे नाव होते. मात्र  शाहबाज खान लहान असतानाच त्याच्या वडीलांचे दुःखद  निधन झाले.  त्यामुळेच त्याच्या आईने शाहबाजला संगीत क्षेत्रात जाण्यास सक्त मनाई  केली  होती. याबद्दलचा खुलासा शाहबाजने एका  मुलाखतीत केला होता.

याबद्दल बोलताना शाहबाज म्हणाला की, त्याला संगीत क्षेत्राची प्रचंड आवड होती. त्याच्या घरात त्याचे वडिल, आजोबा सगळ्यांनीच या क्षेत्रात नाव कमावले  होते. त्यामुळे त्याला सुद्धा आपल्या घराण्याची परंपरा सुरू ठेवायची होती,  त्याच्या आईचीही तशीच इच्छा होती. शाहबाजने आपल्या अभिनयाची चित्रपटातून केली, मात्र त्याला यामध्ये विशेष यश मिळू शकले नाही, त्यामुळे त्याने मालिका क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.

छोट्या पडद्यावर शाहबाजला नकारात्मक भूमिकाच जास्त मिळाल्या, मात्र यामधुनच त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. शाहबाजने ‘नागिन’, ‘राम सिया के लव कुश’, ‘सलीम अनाकरली’, ‘तेणाली राम’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. त्याच्या या भूमिकांचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले. आपल्या भूमिकांबरोबरच  त्याच्यावर एका मुलीची छेडछाड केल्याचाही आरोप झाला होता त्यामुळेही तो चर्चेत आला होता.

Shahbaz Khan

हे देखील वाचा