सुख आणि दुःख हे एकाच नात्याच्या दोन बाजू आहेत. दुःख आले की त्यानंतर सुख येतेच. मागचे काही दिवस मनोरंजनविश्वासाठी खूप क्लेशदायक ठरले. मात्र नुकतेच गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि बाप्पानी सगळीकडे आनंद पसरवण्यास सुरुवात देखील केली. बाप्पांचे आगमन झाले आणि दुसरीकडे अभिनेता शाहीर शेख आणि त्याची पत्नी रुचिकाला बाप्पांचा अविस्मरणीय आणि गोड प्रसाद मिळाला आहे. शाहीर बाबा झाला.
हो शाहिरच्या पत्नीने ऋचिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ऋचिकाच्या डिलिव्हरीबाबत अजून शाहिरकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी एका मोठ्या वेबपोर्टलच्या बातमीनुसार ऋचिकाने १० सप्टेंबरला रात्री मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. फॅन्सला या गोडबातमीबद्दल समजल्यानंतर त्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे.
मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर ते जम्मूला शाहिरच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते. मुंबईमध्ये त्याने एक रिसेप्शन पार्टी देखील दिली होती. जूनमध्ये पहिल्यांदा ऋचिका प्रेग्नेंट असल्याचे समजले होते. ऋचिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली होती ज्यात तिने ज्या ब्रँडचा ड्रेस घातला होता तो ब्रँड फक्त मॅटर्निटी कपड्यांसाठीच प्रसिद्ध आहे. त्यावरून सर्वांना समजले की, ती प्रेग्नेंट आहे. त्यानंतर मागच्या महिन्यात त्याने तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. या बाळाच्या आगमनाने त्याचे कुटुंब पूर्ण झाले आहे.
शाहिरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर शाहीर सध्या ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत दिसत असून, तो लवकरच ‘पवित्र रिश्ता २.०’ मालिकेतून तो त्याचे डिजिटल पदार्पण देखील करणार आहे. तर ऋचिका कपूर ही बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेडची सीनियर वाईस प्रेसिडेंट आणि क्रिएटव प्रोड्यूसर आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून
-‘कौन बनेगा करोडपती’ च्या सेटवर एका चाहतीच्या वागण्यामुळे, ‘बिग बीं’चे वैवाहिक जीवन आले धोक्यात
–प्रार्थना बेहेरेच्याही घरी झाले बाप्पाचे दणक्यात स्वागत, वक्रतुंडाची आराधना करताना दिसली अभिनेत्री