गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवार (6 फेब्रुवारी) रोजी सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली गेली, तसेच भारतरत्न लतादिदींना अनेकांनी श्रद्धांजलीही अर्पण केली. लता मंगेशकर यांचा अंत्यविधी मुुंबईतील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे करण्यात आला. यावेळी सर्वच क्षेत्रातील दिग्गज आणि सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॉलिवूडचा किंगखान शाहरुखनेही (Shahrukh Khan) लता मंगेशकर यांच्या अंतिमसंस्काराला हजेरी लावली होती. (Lata Mangeshkar Passes Away)
शाहरुख खान याने लतादिदींचे अंत्यदर्शऩ घेतले तसेच त्यांना पुष्पही अर्पण केले. मात्र, शाहरुखने यावेळी केलेली कृती सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी होती. तसेच त्याच्या काही कृतीला अनेकांनी आक्षेप घेत, त्याला ट्रोल करण्यात सुरुवात केली. यात सर्वात महत्वाचा आरोप म्हणजे, शाहरुख खान लता मंगेशकर (Shahrukh Khan Lata Mangeshkar) यांच्या पार्थिवावर थुंकला. (Shah Rukh Khan spat) परंतू, यामागचे नेमके सत्य काय आहे ते आपण पाहूयात. (fact check did shah rukh khan spit on lata mangeshkar)
This is my Country… #India
♥️… ♥️ and ♥️#LataMangeshkar ????#ShahRukhKhan #MondayMotivation pic.twitter.com/iGechvUa3Z
— SaifuddinAITC (@SR_Tmc007) February 7, 2022
संपूर्ण प्रकरण काय?
लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान शिवाजी पार्कवर पोहोचला. त्यानंतर लतादिदींचे पार्थिव ठेवले होते त्या स्टेजवर शाहरुख चढला. या दरम्यान शाहरुख खानने लतादीदींसाठी दुआ मागितली. त्याचा हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र, इस्लाम धर्माप्रमाणे शाहरुखने दुआ मागितल्यानंतर पार्थिवावर हळूवार फुंक मारली. त्याचा हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच, टीकेचे वादळ उठले. (Lata Mangeshkar last Rituals)
क्या इसने थूका है ❓ pic.twitter.com/RZOa2NVM5I
— Arun Yadav (@beingarun28) February 6, 2022
हेही वाचा – एका युगाचा अंत…! गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, कलाविश्वावर शोककळा
फंकुला आणि थुंकला.. फरक आहे!
लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ मागितल्यानंतर शाहरुख खानने लतादिदींच्या पार्थिवार हळूवार फुंकर घातली. कोणत्याही व्यक्तीच्या मृतदेहासाठी दुआ मागितल्यानंतर फुंकर घालण्याची ही इस्लामिक धर्माची पद्धत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, वादाला तोंड फुटण्याचे कारण म्हणजे जेव्हा शाहरुख फुंकला तेव्हा त्याच्या ओठांची हालचाल ही थुंकण्यासारखी झाली होती. त्यामुळे अनेकांना तो थुंकला असल्याचा गैरसमज झाला.
पाहा संपूर्ण व्हिडिओ…
This is called Dua…@iamsrk #LataMangeshkar ji pic.twitter.com/VvRqgrsdGa
— Priya Gupta (@priyagupta999) February 6, 2022
The most secular person .But this secularism always brings hate for him????#ShahRukhKhan #LataDidi #LataMangeshkarPassesAway pic.twitter.com/St6gY3FdNa
— Azharul Akash (@AzharulAkash3) February 6, 2022
उर्मिला मातोंडकरकडून स्पष्टीकरण….
शाहरुख खानवर होणारा आरोप पाहता आणि त्यावा विनाकारण ट्रोल केले जात असल्याचे पाहून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने यावर स्पष्टीकरण दिले. तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत, दुआ मागितल्यानंतर ती फुकली जाते थुंकले जात नाही, असे म्हटलंय. (Actor Shahrukh Khan Attend Bharat Ratna Lata Mangeshkar Funeral Fact Check did Kingkhan Spit On LataMangeshkar)
थूकना नही दुआओं को फुँकना कहते हैं।इस सभ्यता,संस्कृति को #भारत कहते हैं।
प्रधानमंत्री जी की फ़ोटो तो लगा रखी हैं, उनसे कुछ सीखा होता।
भारत माँ कीं अनमोल बेटी का गाना सुनें
“ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान,
सारा जग तेरी सन्तान”
(आज का दिन तो छोड़ देतें????????) https://t.co/fjmUWor9Fh pic.twitter.com/c6tkhiEK1d— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) February 6, 2022
शाहरुख खानला विनाकारण ट्रोल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, लता दिदींच्या प्रकरणी त्यावर होणारा आरोप अनेकांना खटकला. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीये. ‘शाहरुख खान याला ज्याप्रमाणे ट्रोल केले जात आहे, तो नालायकपणा आहे. बेशरमपणा आहे.’ अशा भाषेत संजय राऊत यांनी ट्रोलर्सला सुनावले आहे. (fact check did shah rukh khan spit on lata mangeshkar)
हेही वाचा – शेवटच्या क्षणी लतादीदी होत्या वडिलांच्या आठवणीत, वेंटीलेटर असतानाही मागवली गाण्याची रेकॉर्डिंग