Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड शाहरुख खानने खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ होते ‘मन्नत’चे नाव, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना खरेदी केलाय त्याने बंगला

शाहरुख खानने खरेदी करण्यापूर्वी ‘हे’ होते ‘मन्नत’चे नाव, तब्बल ‘एवढ्या’ कोटींना खरेदी केलाय त्याने बंगला

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा मंगळवारी (२ नोव्हेंबर) त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये त्याने खूप मेहनत करून त्याचे नाव कमावले आहे. दर वर्षी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत असतात. त्याची एक झलक बघण्यासाठी सगळे वाट बघत असतात. तो देखील त्याच्या चाहत्यांना अजिबात नाराज करत नाही. तो ‘मन्नत’च्या बाहेर येऊन सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. ‘मन्नत’बद्दल जेव्हा जेव्हा बॉलिवूडमध्ये बोलले जाते तेव्हा त्याच्याबाबत अनेक किस्से सांगितले जातात.

शाहरुख खानचा ‘मन्नत’ला जाण्याचा किस्सा खूपच मजेशीर आहे. शाहरुख खानने १९९७ साली ‘येस बॉस’ या चित्रपटाच्या शूटिंग वेळी पहिल्यांदा ‘मन्नत’ला पाहिले. पहिल्याच नजरेत त्याने ‘मन्नत’ला विकत घेण्याचे स्वप्न बघितले. त्यावेळी ‘मन्नत’चा मालक एक गुजराती व्यक्ती होता. शाहरुख खानने खरेदी करण्याआधी ‘मन्नत’चे नाव ‘विला विएना’ असे होते. या नंतर शाहरुखने खूप मेहनत करून ‘मन्नत’ला मिळवले आहे (Shahrukh Khan birthday special actor bought mannat in 14 carores decided to purchase while shooting film yes boss)

शाहरुख खानची २००१ मध्ये विला विएनाच्या मालकाशी पहिली भेट झाली. यानंतर शाहरुखने वाई किशोर शेद भानू संजना ट्रस्टकडून हा बंगला खरेदी केला. सुरुवातीला त्याने या बंगल्याला जन्नत नाव देण्याचा विचार केला होता. मग परत विचार बदलून त्याने ‘मन्नत’ असे नाव दिले.‌त्यावेळी त्याने तब्बल १३.३२ कोटी रुपयांना हा बंगला खरेदी केला होता. आज त्याच बंगल्याची किंमत २०० कोटीच्या आसपास असेल. त्याने २००५ साली ‘मन्नत’ या नावाने बंगल्याचे रजिस्ट्रेशन केले. ‘मन्नत’ पाच मजल्यांचा आहे. मुंबईमधील बांद्राच्या सी फेसिंगवर हे सुंदर घर आहे. घराचे इंटेरियर डिझायनिंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने स्वतः केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा सर्वांसमोर शाहरुखला ‘आय लव्ह यू अक्षय’ म्हणाली होती महिला चाहती; रंजक आहे ‘तो’ किस्सा

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा