Tuesday, July 9, 2024

आर्यनला जामीन मिळताच बहीण सुहाना न्यूयॉर्कहून लवकरच येणार मुंबईत; एकत्र साजरी करणार दिवाळी

किंग खान म्हणजेच शाहरुखला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, त्याचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाकडून जामीनही मिळाला आहे आणि तो आता तुरुंगातूनही बाहेर पडला आहे. यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. याचा आनंद थेट न्यूयॉर्कमध्ये पोहोचला आहे. कारण, शाहरुखची मुलगी सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुखचा २ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे आणि दिवाळी सणही तोंडावर आहे. त्यामुळे सणाला सुरुवात होण्यापूर्वीच सुहाना मुंबईत परतण्याची योजना बनवत आहे. असे असले, तरीही भाऊ आर्यन अं’मली पदार्थ प्रकरणात अडकल्यानंतर तिला कुटुंबाने सल्ला दिला होता की, तिने आता मुंबईत येऊ नये, अमेरिकेतच राहावे. अशात आता आर्यन तुरुंगातून बाहेर आला आहे, तर सुहानाही लवकरच मुंबईत येईल. सुहानाला तिच्या संपूर्ण कुटुंबाला भेटायचे आहे. 

भावाच्या जामीनावर व्यक्त केला आनंद
भाऊ आर्यन खानच्या जामीनाची बातमी मिळताच सुहानाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लहानपणीचा एक ब्लॅक एँड फोटो कोलाज फोटो शेअर केला होता. हा कोलाज फोटो शेअर करत तिने “आय लव्ह यू,” असे लिहिले होते. एका तासातच या पोस्टला अडीच लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले होते.

सुहाना आहे २१ वर्षांची
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान २१ वर्षांची आहे. तिचा जन्म २२ मे, २००० रोजी मुंबईत झाला होता. सुहाना सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असते. ती नेहमी आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Actor Shahrukh Khan Daughter Suhana To Return To Mumbai Soon Following Aryan Khans Release From Jail)

सुहानाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१९ मध्ये आलेल्या ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’मध्ये काम केले होते. इंग्रजी भाषेत तयार झालेल्या या १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममधील सुहानाच्या अभिनयाला चांगली दाद मिळाली होती. त्यामुळे तिच्या बॉलिवूड पदार्पणाबाबतही उत्सुकता वाढली होती. असे असले, तरीही शाहरुखने म्हटले होते की, चित्रपटात येण्यापूर्वी सुहाना आपले शिक्षण पूर्ण करेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये चित्रपट निर्मितीचा कोर्स करत आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर ती अभिनयाकडे वळेल.

शाहरुखबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘झिरो’ या चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! आर्यन खान आर्थर रोड कारागृहातून बाहेर, लवकरच होणार मन्नतवर रवाना

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

-काय सांगता! जामीन तर मिळणार, परंतु न्यायालयाने आर्यनसमोर ठेवल्या ‘या’ एकूण ११ अटी

हे देखील वाचा