बॉलिवूड कलाकारांचे बॉडीगार्ड आणि त्यांचा पगार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या सर्वांमध्ये कोणत्या कलाकाराचा बॉडीगार्ड चर्चेत असतो?, असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या मुखात सर्वप्रथम सलमान खानचे नाव येईल. सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा नेहमीच माध्यमांचे लक्ष वेधताना दिसतो. याव्यतिरिक्त अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बॉडीगार्ड जलालही आपल्या पगारामुळे चर्चेत असतो. अशातच आता बॉलिवूड ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खानच्या बॉडीगार्डच्या पगाराची बातमी समोर आली आहे. त्याचा पगार वाचून तुम्हालाही विश्वास बसणे कठीण होईल.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सलमान शेराला वर्षाकाठी २ कोटी रुपये पगार देतो, तर दीपिका आपला बॉडीगार्ड जलालला १.२ कोटी रुपये पगार देते.
शाहरुख खानच्या बॉडीगार्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे नाव रवि सिंग आहे. तो दोन वर्षांपासून त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे. शाहरुख जिथे जाईल, तिथे रवि त्याच्या सावलीप्रमाणे सोबत असतो. मग ते शूटिंगबाबत असो किंवा सुट्ट्यांबाबत. रवि सिंग सर्वाधिक पगार घेणाऱ्या कलाकारांच्या बॉडीगार्ड्सच्या यादीत सामील आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुख खान त्याला वर्षाकाठी २.७५ कोटी रुपये देतो. याचा अर्थ शाहरुख प्रत्येक महिन्याला २३ लाख रुपये रवि सिंगवर खर्च करतो. (Actor Shahrukh Khan Gives Enormous Salary To His Bodyguard Forget Salman Khan Shera)
SRKCHENNAIFC Wishing @iamsrk's Bodyguard #Ravi Dada A very Happy Birthday.Lots Of Love & Joy to him.
???????????? pic.twitter.com/2KJiNmVMDa— ♡♔SRKCFC♔♡™ (@SRKCHENNAIFC) February 22, 2015
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या आपल्या ‘पठाण’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूडची ‘मस्तानी’ म्हणजेच दीपिका पदुकोणही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटात जॉन अब्राहमदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
असे म्हटले जात आहे की, छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. दीपिका आणि शाहरुख यांचा हा एकत्र चौथा चित्रपट असेल. यापूर्वी ते ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटात एकत्र झळकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अबब! मौनी रॉयने बिकिनीमध्ये केला इंटरनेटवर कहर, बोल्ड अंदाज पाहून चाहतेही झाले हैराण
-Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’
-जेव्हा शाहरुख खानला महिला चाहती म्हणाली होती, ‘आय लव्ह यू अक्षय’; रंजक आहे ‘तो’ किस्सा