Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड खरं की काय! अजयच्या चित्रपटात काजोल करणार शाहरुखसोबत रोमान्स?, एका क्लिकवर घ्या जाणून

खरं की काय! अजयच्या चित्रपटात काजोल करणार शाहरुखसोबत रोमान्स?, एका क्लिकवर घ्या जाणून

सन १९९२मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे शाहरुख खान आणि काजोल, या दोघांना यावर्षी सिनेजगतात पदार्पण करून ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि काजोल, यांनी शेवटच्या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता त्यांचा पुढचा सिनेमा कोणता असेल, यावर सध्या चर्चा रंगल्या आहेत.

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि काजोल (Kajol) यांचे नाव घेताच चाहत्यांना उत्सुकता लागते दोघांच्या जोडीला एका नव्या कथेसोबत पाहण्याची. असेच काही आताही झाले आहे. अचानक सोशल मीडिया आणि बॉलिवूडमध्ये त्यांच्या नवीन चित्रपटाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, याची तयारी दुसरे कोणी करत नसून खुद्द काजोलचा पती अजय देवगण (Ajay Devgan) करत आहे. वाढत्या वयात अजयचं लक्ष आता अभिनयावर कमी आणि दिग्दर्शनावर जास्त आहे. त्याने दिग्दर्शक म्हणून बनवलेले चारही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. यामुळेच आता तो शाहरुख आणि काजोल एकसोबत सिनेमा बनवणार आहेत, म्हणजे तो हिट होईल.

सगळे आहेत व्यस्त
सध्यातरी, या सगळ्या फक्त अफवाच आहेत. यात कोणतेही सत्य नाही. अजय देवगण, त्याच्या ‘भोला’ या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यात त्याला वर्षभर तरी लागणार आहे. दुसरीकडे, शाहरुखचेही २०२३मध्ये तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. ‘पठाण’ (Pathaan), ‘जवान’ (Jawaan) आणि ‘डंकी’ (Dunki) हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. एकानंतर एक, तो या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

आता काजोलबद्दल बोलायचे झाले, तर तीही तिच्या कारकीर्दीमध्ये व्यस्त आहे. थोड्या दिवसांपूर्वीच तिने दिग्दर्शक रेवतीचा चित्रपट ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) हा पूर्ण केला. यानंतर तिने करण जोहरचा सिनेमा ‘लस्ट स्टोरीज २’ (Lust Stories 2) याचं शूटिंग पूर्ण केलं आहे, जो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यासोबतच, एका वेबसीरिजमध्येही ती काम करत असल्याची चर्चा आहे. अशाप्रकारे, तिन्ही कलाकार आपापल्या कारकीर्दीमध्ये व्यस्त असून, अद्याप त्यांच्या एकत्र काम करण्याची कोणतीही योजना नाही.

आहेत पार्टी होण्याचे संकेत
शाहरुख आणि अजय देगवण यांच्यात खास काही जमत नाही. जरी, ते एक-दोन जाहिरातींमध्ये एकत्र दिसले असले, तरीही ही एक व्यावसायिक गोष्ट आहे. दोघेही बॉलिवूडमधील एखाद्या सिनेमात एकत्र दिसतील, याची शक्यता कमीच आहे. शाहरुख आणि काजोल देखील, सध्या कोणत्याही प्रोजेक्टवर एकत्र काम करत नाहीयेत. मात्र, दोघेही सिनेसृष्टीत त्यांनी पूर्ण केलेल्या तीस वर्षांनिमित्त, लवकरच पार्टी देऊ शकतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अरर! शाहरुख खानचा ‘हा ‘फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल, भडकले चाहते

आमिरच्या लेकीने आजीबाईंशी घालून दिली बॉयफ्रेंडची भेट; चाहते म्हणाले, ‘मग कधी उरकताय?’

विमानतळावर दिसल्या बच्चन मायलेकी; आराध्याची उंची पाहून नेटकरीही म्हणाले, ‘ही लवकरच…’

हे देखील वाचा