Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव! अपघातग्रस्त मुलीच्या कुटुंबाला ‘किंग खान’च्या एनजीओकडून मदतीचा हात

शाहरुखवर कौतुकाचा वर्षाव! अपघातग्रस्त मुलीच्या कुटुंबाला ‘किंग खान’च्या एनजीओकडून मदतीचा हात

संपूर्ण देश दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळे हादरला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीच्या सुलतानपुरी ते कंंझावलादरम्यान बलेनो गाडीने 20 वर्षीय अंजली सिंग हिला तब्बल 12 किमी घासत नेले. या दुर्दैवी घटनेत अंजलीने प्राण गमावले. या प्रकरणात आता बॉलिवूडचा ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुख खान मदतीसाठी धावला आहे. शाहरुख खानची एनजीओ मीर फाऊंडेशनने अंजलीच्या कुटुंबाला मदत करण्याची घोषणा केली आहे. शाहरुख गरजूंना मदत करण्यासाठीही ओळखला जातो. तो जी एनजीओ चालवतो, ती वेळोवेळी गरजू व्यक्तींची मदत करण्यासाठी पुढे येते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, “शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या मीर फाऊंडेशन (Meer Foundation) या एनजीओने अंजली सिंग (Anjali Singh) हिच्या कुटुंबाला कथित रक्कम दिली आहे. अंजली ही तिच्या कुटुंबात एकमेव कमावती होती. तिच्या कुटुंबात आई आणि भाऊ-बहिणीचा समावेश आहे.” असेही सांगण्यात आले की, अंजलीच्या भावंडांना दिलासा देत त्यांच्या आईला आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी ही रक्कम देण्यात आली आहे.

अंजलीच्या प्रकरणात शाहरुख खानची आर्थिक मदत
मात्र, शाहरुख खानच्या मीर फाऊंडेशनने किती रुपयांची आर्थिक मदत केली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये. मात्र, अभिनेत्याने उचललेल्या या चांगल्या पावलामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार प्रशंसा केली जात आहे. यापूर्वीही मीर फाऊंडेशनने गरजू व्यक्तींची मदत केली आहे.

मीर फाऊंडेशनबद्दल थोडक्यात
शाहरुख खानने मीर फाऊंडेशनची स्थापना वडील मीर ताज मोहम्मद खान यांच्या नावावर केली होती. या एनजीओचा उद्देश तळागाळापर्यंत जाऊन तिथे बदल करणे आणि महिलांना सशक्त करणारे जग बनवण्यासाठी काम करणे आहे.

शाहरुखचा पठाण लवकरच चित्रपटगृहात
खरं तर, शाहरुख खान हा त्याच्या आगामी ‘पठाण’ या सिनेमामुळे खूपच व्यस्त आहे. जवळपास 200 कोटींहून अधिक रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा 25 जानेवारी रोजी रिलीज होईल. या सिनेमात शाहरुखव्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (actor shahrukh khan ngo provided financial help in delhi accident case donates money in anjali singh case)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक
‘या’ सुपरस्टारला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस; मेडिकल स्टाफसोबतचा फोटो शेअर करत दिली अपडेट

हे देखील वाचा