गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने सगळीकडेच शोककळा पसरली होती. शिवाजी पार्कवर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी देशातील अनेक नेते कलाकार उपस्थित झाले होते. यावेळी अभिनेता शाहरुख खानच्या एका व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. याचसंबंधी शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओसमोर आला असून ज्यामध्ये तो राष्ट्रवादावर बोलताना दिसत आहे.
लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या एका व्हिडिओने सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. मुस्लिम धर्माप्रमाणे लता दीदींच्या अंतिमदर्शनावेळी फातिहा पडून झाल्यानंतर त्यावर फुंकर मारली होती. हाच मुद्दा उचलत काही लोकांनी शाहरुख खान पार्थिवावर थुंकला अशी चर्चा सुरू केली होती. त्यावेळी शाहरुख खानला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मात्र समाजातील काही जाणकार मंडळींनी यावर टीकेची झोड उठवत शाहरुख खानचे समर्थन केले होते. इतकेच नव्हे तर त्या व्हायरल फोटोचे हाच आमचा महान भारत आहे म्हणत कौतुकही झाले होते. आता याच पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खानचा आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खानने 1997 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ दाखविण्यात येत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख खानने त्याला देशद्रोही म्हणल्याने दुःख व्यक्त केले आहे सोबतच या संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली आहे. यामध्ये शाहरुख खान म्हणतो की, “मला आठवते शाळेत असताना आम्ही निबंध लिहायचो मेरा देश भारत मला वाटत आता हे बदलले पाहिजे. भारत एक देश आहे आणि आम्ही सगळे त्याचे नागरिक आहोत असे केले पाहिजे. मला राष्ट्रद्रोही म्हणणारे तेच आहेत जे या देशाचे नागरिक समजत नाहीत. आपल्याला या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटते कारण माझ्या कुटुंबानेही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली आहे. मात्र अशा वाईट लोकांमुळे आपला देश बरबाद होत चालला आहे.”
त्याने पुढे म्हटले की, “जेव्हा जेव्हा अशा बातम्या वाचतो तेव्हा खूप दुःख होते. यावेळी माझ्या वडिलांनी म्हटलेले वाक्य मला आठवते की या देशाला असच स्वतंत्र ठेव जशा प्रकारे मी देऊन चाललोय.” अभिनेता शाहरुख खानचे वडिल मीर ताज मोहम्मद खान स्वातंत्र्य सेनानी होते तसेच ते अभियंता सुद्धा होते. त्यांचे बालपण पाकिस्तानमधील पेशावर मध्ये गेले. भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते दिल्लीमध्ये आले. त्यावेळी शाहरुख खान 15 वर्षाचा होता. त्याच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.
हेही वाचा :
रणवीर सिंगने शोधली छोटी दीपिका, व्हिडिओ शेअर करून केले भरभरून कौतुक
बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत टॉलिवूड चित्रपटांनी मारली बाजी, कमाईच्या बाबत ठरले टॉलिवूडचे पारडे जड