Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड काजोलसोबतच्या अफेअरच्या अफवांवर शाहरुखने दिले होते उत्तर; म्हणाला होता, ‘मी काजोलबरोबरही तिच्या घरी…’

काजोलसोबतच्या अफेअरच्या अफवांवर शाहरुखने दिले होते उत्तर; म्हणाला होता, ‘मी काजोलबरोबरही तिच्या घरी…’

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या चित्रपट कारकिर्दीबरोबरच आपल्या लव्ह लाईफमुळे देखील कायमच चर्चेचा विषय ठरत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची कित्येक वर्षांपूर्वी लग्न होऊनही लग्नापूर्वीच्या अफेअरच्या चर्चा आजही होत आहेत. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीने मोठ्या पडद्यावर एकापेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. एक काळ होता, जेव्हा शाहरुख खान आणि काजोल यांच्या अफेअरची चर्चा होती. शाहरुख खानने अशा अफवांना उघडपणे उत्तर दिले होते. तसे केवळ काजोलच नाही, तर जुही चावला आणि प्रियांका चोप्रासोबतही शाहरुखच्या अफेअरबद्दल बऱ्याच अफवा पसरल्या होत्या.

शाहरुख आणि काजोलने ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले’, ‘बाजीगर’, ‘करण अर्जुन’ आणि ‘माय नेम इज खान’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले. त्या दरम्यान या दोघांचे अफेअर असल्याची माहिती सातत्याने समोर येत होती. अनेक वेळा शाहरुख आणि काजोल दोघांनाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. ज्याचे उत्तर शाहरुखने त्याच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये दिले होते.

शाहरुखने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, मॅगझिन फोटो वाढवून दाखवतात. ते कलाकारांना सह-कलाकारांशी देखील जोडतात. जेव्हा शाहरुखला विचारण्यात आले की, त्याचे नाव काजोलबरोबर जोडले आहे, तेव्हा तो म्हणाला, “खरंच? ती लहान आहे, ती आंटी तनुजाची मुलगी आहे, एका छोट्या बहिणीसारखी, अगदी तिला गौरीही पसंत करते.”

यासोबतच शाहरुख म्हणाला होता की, “मी जुही, माधुरी, मनीषा, शिल्पा, सोनाली, नगमा, उर्मिला सारख्या प्रत्येकासोबत काम करतो, पण मी रात्री कोणाबरोबरही त्यांच्या घरी जात नाही. मी काजोलबरोबरही तिच्या घरी गेलो नाही.” आपल्या सहकलाकारांबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता की, “तो समलिंगी नाही, पण हे खरे आहे की, तो मुलींना पाहतो, त्यांच्यावर फिदा होत नाही, एक सुंदर चेहरा त्याचे मन मोहित करत नाही.”

शाहरुख पुढे म्हणाला होता की, “जर माझे कधीच अफेअर झाले नसेल, तर मी इतका हुशार आहे की, मी कोणालाही कळू देणार नाही. जर असे झाले तर… जर माझे कोणाशी अफेअर असेल, तर मी इतका चांगला अभिनेता आहे की, मी कोणालाही कळू देणार नाही. आता या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींमुळे मी जुहीसोबत काम करणे बंद केले.”

“जर अशा अफवा उडत राहिल्या, तर मी काजोलसोबत काम करणे बंद करेन आणि लाज वाटेल कारण ती एक शानदार अभिनेत्री आहे. जर माझा रविवार खराब असेल, पण जर मीडियाने आमच्या प्रकरणाबद्दल पुन्हा बोलले, तर मी त्याला छतावर घेऊन जाईन आणि ‘बाजीगर स्टाईल’ने त्याला खाली ढकलून देईन.” काजोलनेही अफेअरच्या माहितीवर अशी प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती की, “मी शाहरुखची एकमेव मैत्रीण आहे, जी त्याचे गाल खेचू शकते.”

शाहरुख खानने १९९२ साली आलेल्या ‘दिवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शाहरुखची जी भूमिका होती, ती आधी अरमान कोहलीला ऑफर करण्यात आली होती. अरमानने या सिनेमासाठी होकार देखील दिला होता. इतकंच नाही, तर त्याचा फोटो असणारे सिनेमाचे पोस्टर देखील छापण्यात आले होते. मात्र, काही कारणामुळे त्याने नंतर चित्रपट करण्यास नकार दिला आणि या चित्रपटाची शाहरुखला ऑफर मिळाली. या चित्रपटाने बॉलिवूडला एक मोठा सुपरस्टार दिला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे

-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण

-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा