अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रुझ अं’मली प्रकरणात २ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल २६ दिवसांनी आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. आज सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर या केसमध्ये आर्यनला जामीन मिळाला आहे. सतीश मानशिंदे, अमित देसाई, मुकुल रोहितगी या तीन मोठ्या वकिलांना आर्यनला जामीन मिळवून देण्यात यश आले आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना तिघांनाही जामीन मंजूर झाला आहे.
मागच्या तीन दिवसांपासून या जमिनीवर कोर्टात सुनावणी चालू होती. अखेर आज सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि आर्यनला जामीन मिळाला आहे. मात्र, हे तिघे सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) जेलमधून बाहेर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची जामीनाची ऑर्डर आर्थर रोड जेलमध्ये पोहोल्यानंतरच जामीनाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘आमच्या अब्रूची लख्तरे चारचौकात उधळली जात आहे’, म्हणत क्रांती रेडकरने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो
-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण