या वर्षात अनेक अभिनेत्री अभिनेत्यांनी लग्न केली. काहींनी आपले लग्न थाटामाटात केली. तर काहींनी कोरोनामुळे आपला लग्न सोहळा अगदी मोजक्या पद्धतीने मोजक्या लोकात साजरा केला. लग्न बंधनात या वर्षात अनेक हिंदी आणि मराठी अभिनेत्री अभिनेते बांधले गेले. तसेच ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील एक अभिनेता लग्न बंधनात बांधला गेला आहे.
कोरोनाच्या कारणामुळे त्यांनी आपले लग्न गुपचूप पद्धतीने पार पाडले. मालिका या माध्यमातून अनेक कलाकार प्रसिद्ध होतात, अनेक कलाकार लवकरात लवकर प्रेक्षकांच्या समोर येतात आणि त्यांना लवकर प्रसिद्धी मिळते. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील सर्व कलाकार हे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. त्यातील प्रत्येक भूमिका लोकांना आवडलेली आहे. मग मुख्य अभिनेता असो किंवा खलनायक, अभिनेत्री असो किंवा खलनायिका. ही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील खलनायक शैलेश कोरडे यालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. (actor shailesh korade get married with shruti kulkarni)
शैलेश कोरडे याने या मालिकेत दादासाहेबांची भूमिका साकारली आहे. हाच शैलेश कोरडे आता लग्नबेडीत अडकला आहे. अभिनेत्री श्रुती कुलकर्णी हिच्यासोबत तो विवाह बंधनात अडकला आहे. शैलेश आणि श्रुती हे सात वर्ष रिलेशनमध्ये होते आणि आता या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. ही गोड बातमी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवरून आपल्या चाहत्यांना दिली.
श्रुतीने लग्नात गुलाबी रंगाची साडी शैलेशने निळा रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांचाही जोडा खूप सुंदर दिसत आहे. लग्न सोहळा खूप थाटामाटात पार न पडता अगदी साध्या पद्धतीने पार पडला. कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा मोजक्याच लोकांत पार पडला. शैलेश सांगतो की, लग्नाचा हा सोहळा खूप मोजके मान्यवरात पार पडला. खरंतर हे लग्न २७ डिसेंबरला पार पडले परंतु शैलेशने ही बातमी इंस्टाग्राम पेजवरून प्रेक्षकांना नंतर सांगितली. शैलेश आणि श्रुतीचा जोडा खूप सुंदर दिसत आहे आपल्याला फोटोमध्ये पाहायला मिळतेच. मोजक्या लोकांचा आशीर्वादात हा सोहळा पार पडला.
हेही वाचा :